shanoo sharma revealed selection of aneet padda for saiyaara film  Instagram
मनोरंजन

Saiyaara | 'सैयारा'च्या ऑडिशनमध्ये अनित पड्डाने साकारला होता आलिया भट्टचा 'हायवे'मधील सीन

Saiyaara Aneet Padda | 'सैयारा'साठी अनित पड्डाचे आलिया भट्टच्या सीनसोबतचे ऑडिशन ठरले खास

स्वालिया न. शिकलगार

भारतीय बॉक्स ऑफिसवरील 'सैयारा'ची कमाई -

  • पहिला आठवडा - १७५.२५ कोटी

  • दुसरा आठवडा- ११० कोटी

  • तिसरा आठवडा - २९.७५ कोटी

  • चौथा आठवडा- १०.७५ कोटी

एकूण कलेक्शन -३२५.७५ कोटी

YRF’s casting director Shanoo Sharma calls Aneet Padda gold

मुंबई - 'कॅडबरी गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री अनीत पड्डा हिचा अभिनय वाखाणण्याजोगे आहे. खुद्द वायआरएफची कास्टींग डायरेक्टर शानू शर्मा हिने तिच्या अभिनयाबाबत खुलासा केला आहे. शानू शर्मा हिने अनीतला गोल्ड म्हटले आहे. शानू शर्मा हिने खुलासा केला की, कशा प्रकारे अनीतने ऑडिशन वेळी दमदार अभिनय करून दाखवला आणि सर्वांना थक्क केलं.

शानू म्हणाली, जेव्हा तिने इम्तियाज अलीच्या हायवे मध्ये आलिया भट्टच्या सीनवर तिला परफॉर्म करायला सांगितले होते. शानू म्हणाली, अनीतच्या या ऑडिशनमुळे तिला चकित केलं होतं आणि नंतर सैयारामध्ये अनीतला परफॉर्म करताना पाहून तिच्यावर, अभिनयावर विश्वास झाला.

'अहानच्या लोकप्रियतेमागे अफाट मेहनत'

अहानच्या निवडीविषयी शानू म्हणाली - अहान पांडे हे यश रातोरात मिळालेले नाही. यामागे त्याची अनेक वर्षांची मेहनत आहे, जे खूप कमी लोकांना माहिती असेल. तिने खुलासा केला की, अहान पांडेने कोविड-१९ च्या आधी ३ वर्षा प्रशिक्षण घेतले होते. आणि डेब्यू पुढे ठकलण्यात आला. पण, तेव्हापासून सहनशीलता ठेवून लोकप्रियतेसाठी इतक्या वर्षांची प्रतीक्षा खूप अधिक आहे.

रिपोर्टनुसार, शानू म्हणाली, 'सुरुवातीचे ३ वर्ष प्रशिक्षण घेण्यात गेले. आम्ही ट्रेनिंग घेतले आणि शर्वरी वाघ देखील त्याच मार्गावर होती. यासाठी आम्ही तिची आणि अहानचे सीन्स घेतले. ते दोघे ट्रेनिंग दरम्यान, सोबत प्रॅक्टिस करायचे. मी स्वत: त्यांना ट्रेनिंग देत होते. त्यानंतर कोविड आला. त्यामुळे अहानने 'रेल्वे मॅन' साठी सह-दिग्दर्शक म्हणून काम केले.

taran adarsh tweet
'सैयारा' बॉक्स ऑफिस कलेक्शन
मोहित सूरी दिग्दर्शित सैयाराने भारतीय बॉक्स ऑफिसवर ३०० कोटी पार करत ३२५ कोटींचा आकडा गाठला आहे. जगभरातील कमाई ५०० कोटींहून अधिक झाली आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी कमाईचे आकडे ट्विट केले आहेत. चित्रपटात अहान-अनीत शिवाय आलम खान, सिड मक्कड, शान ग्रोवर, राजेश कुमार, वरुण बडोला यांच्या देखील भूमिका आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT