अभिषेक मलिक या ये है मोहब्बतें मालिकेतील अभिनेत्याने गर्लफ्रेंडशी विवाह केला आहे. अभिषेक मलिकने फॅशन स्टायलिस्ट सुहानी चौधरीशी लग्न केलं. दोघांच्या या ड्रीम वेडिंगचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कोरोना काळात अभिषेक-सुहानी यांची जवळीक वाढली. दोघांच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळींच्या उपस्थित विवाह सोहळा पार पडला.
या जोडीने लग्नात मॅचिंग आउटफिट घातलं होतं. अभिषेक बेज शेरवानीमध्ये खूप सुंदर दिसत होता. सुहानी पेस्टल शेडच्या हेवी ब्रायडल लहंग्यात खूप सुंदर दिसत होती. अभिषेकने फोटो शेअर करत लिहिलंय, "मिस्टर ॲण्ड मिसेज मलिक."
याआधी त्यांनी आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं होतं- "खरी प्रेम कहाणी कधी संपत नाही."
या कपलने प्री-वेडिंग शूटदेखील केलं होतं. अभिषेकने काही निवडक फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.
अभिषेक एक उत्तम अभिनेता
२०१२ मध्ये कलर्स टीव्हीवरील 'छल-शह और मात' मधून अभिनयाला सुरुवात केली. २०१३ मध्ये, अभिषेक सोनी टीव्हीवरील 'दिल की नज़र से खूबसूरत' मालिकेत काम केल. झी टीव्हीवरील 'पुनर्विवाह – एक नई उम्मीद' मालिकेत त्याने रोहन दुबेचे पात्र साकारले आहे.
'कैसी ये यारियां'मध्ये हर्षद सक्सेनाची भूमिका साकारल्यानंतर त्याला प्रसिद्धी मिळाली होती. 'ये है मोहब्बतें' मध्ये तो इशिता भल्लाच्या जावयाच्या व्यक्तीरेखेतही दिसला होता.
अधिक वाचा –