Actor Yash visits Dharmasthala photos viral  
मनोरंजन

Actor Yash visits Dharmasthala | ‘टॉक्सिक’च्या प्रदर्शनापूर्वी यशने घेतले धर्मस्थळ येथे जाऊन दर्शन, फोटो आले समोर

Actor Yash visits Dharmasthala | ‘टॉक्सिक’च्या यशासाठी यशने घेतले श्री मंजुनाथाचे आशीर्वाद; धर्मस्थळचे फोटो व्हायरल

पुढारी वृत्तसेवा

‘रॉकिंग स्टार’ यश सध्या आपल्या ‘टॉक्सिक: अ फेअरीटेल फॉर ग्रोन-अप्स’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी यशने मंगळवारी, २५ ऑगस्ट रोजी धर्मस्थळला भेट देत श्री मंजुनाथ स्वामींचे दर्शन घेतले. धर्मस्थळला भेट देणे ही यशची जुनी परंपरा आहे. आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी तो आवर्जून भगवान मंजुनाथाचे दर्शन घेतो, असे म्हटले जाते. यंदाही त्याने ही परंपरा कायम ठेवत ‘टॉक्सिक’च्या यशासाठी विशेष प्रार्थना केली.

‘टॉक्सिक’ हा यशचा २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘केजीएफ: चॅप्टर २’नंतरचा मोठ्या पडद्यावरील महत्त्वाचा चित्रपट आहे. गीतू मोहनदास यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, पोर्तुगीज राजवटीच्या काळातील गोव्याच्या पार्श्वभूमीवर कथा आकाराला येते. या चित्रपटाला ‘पिरियड गँगस्टर ॲक्शन ड्रामा’ म्हणून सादर करण्यात आले आहे. KVN प्रॉडक्शन्स आणि मॉन्स्टर माईंड क्रिएशन्सच्या बॅनरखाली ‘टॉक्सिक’ची निर्मिती करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, ‘टॉक्सिक’मध्ये यश दुहेरी भूमिकेत दिसत आहे. त्याच्यासोबत कियारा अडवाणी, नयनतारा, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत यांसारख्या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्यामुळे चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच यशच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेकांनी यशच्या अभिनयाचे आणि त्याच्या जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्सचे कौतुक केले आहे. ॲक्शन सीन्स, संगीत आणि बॅकग्राउंड स्कोअर यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही चाहत्यांनी तर यशची भूमिका त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरींपैकी एक असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी संमिश्र प्रतिक्रिया दिलीय. चित्रपटाचा मोठा रनटाइम ही एक उणीव असल्याचे काहींनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT