Jaya Bachchan B'day,  
मनोरंजन

जेव्हा अमिताभ बच्चन यांनी जयाला केलं होतं KISS आणि बाजूला रेखा पाहतच होती !

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांचे रेखासोबतचे नाते  हे जगजाहीर आहे. त्यांच्या चाहत्यांनाही याची चांगलीच कल्पना आहे. रेखा, जया आणि अमिताभ बच्चन यांच्या लव्ह ट्रँगलबद्दलचे बॉलिवूड इंडस्ट्रीतील, असे अनेक किस्से आहेत. ज्याची माहीती अधिकृतपणे नसली तरीही, चाहत्यांचा असा विश्वास आहे की, हे किस्से निव्वळ किस्से नाहीत तर त्यांचा वास्तवाशी खूप जवळचा संबंध आहे. बॉलिवूडमधील स्ट्रार जोडी जया आणि अमिताभ यांचे गेले पाच दशकांपासून प्रचंड चाहते आहे.

अमिताभ आणि जयाचे KISS

अमिताभ बच्चन, रेखा आणि जया एकत्र दिसल्याचे क्वचितच घडले असले, तरी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात हे तिघेही एकत्र दिसले होते. एका स्क्रीन अवॉर्ड्समध्ये रेखाच्या उपस्थितीतच अमिताभ बच्चन अगदी खुलेपणाने जया बच्चन यांच्यावरील प्रेम व्यक्त करताना दिसल होते. या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी जया बच्चनला खुलेआम किस केले होते, तेव्हा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला.

KISS : मनात होतं की, हा योगायोग होता   ?

14 जानेवारी 2014 रोजी मुंबईत झालेल्या स्क्रीन अवॉर्ड्समध्ये जेव्हा अमिताभ बच्चन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली, तेव्हा या ठिकाणीच बिग बीनी जया बच्चन यांचा KISS घेतला होता. तो क्षण काही सेकंदाचा असला तरी, हा फोटो मात्र पाहता क्षणीच सर्वत्र व्हायरल झाला होता. तथापि, हे बिगबीच्या मनातच होतं की, योगायोगाने घडले हे चाहत्यांना अद्यापही हे न सुटलेलं कोडं आहे.

याचप्रसंगी अमिताभ आणि रेखा आले आमने-सामने

योगायोगाने रेखाही या अवॉर्ड नाईट कार्यक्रमात उपस्थित होत्या. या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी रेखाचे हात जोडून 'नमस्ते' म्हणत स्वागत केले. आणि जया बच्चनही रेखासोबत हसताना दिसल्या. या घटनेची चांगलीच चर्चा झाली. जया बच्चन आज त्यांचा ७४ वा वाढदिवस साजरा करत आहेत. चित्रपटसृष्टीत जया यांनी अमिताभ यांच्यासोबतही दीर्घकाळ काम केले आहे.

हेही वाचलत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT