War 2 Song released tomorrow  Instagram
मनोरंजन

War 2 Song | कियारा अडवाणीला खास बर्थडे गिफ्ट! YRF कडून 'वॉर २' चे पहिले गाणे उद्या होणार रिलीज!

कियारा अडवाणीला खास बर्थडे गिफ्ट! YRF कडून 'वॉर २' चे पहिले गाणे उद्या होणार रिलीज!

स्वालिया न. शिकलगार

kiara advani special gift from yrf her birthday

मुंबई - यशराज फिल्म्सकडून कियारा आडवाणीला वाढदिवसाचं खास गिफ्ट मिळणार आहे. आगामी स्पाय-ॲक्शन चित्रपट 'वॉर २' चे पहिले गाणे ‘आवन जावन’, जो एक रोमँटिक ट्रॅक आहे, तो उद्या रिलीज होणार आहे. खास म्हणजे उद्या ३१ जुलै रोजी कियाराचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने गाणे रिलीज केले जाईल.

'वॉर २' हा अयान मुखर्जीने आपल्या सोशल मीडियावर ही माहिती दिलीय की, चित्रपटाचे पहिले गाणे ‘आवन जावन’ आहे, ज्यामध्ये सुपरस्टार ऋतिक रोशन आणि कियारा आडवाणी यांची जोडी पहिल्यांदा एकत्र दिसणार आहे.

अयानने ‘आवन जावन’ या गाण्याची एक झलक देखील त्यांच्या पोस्टमध्ये शेअर केली आहे. अयान यांनी सांगितलं की, ‘ब्रह्मास्त्र’ मधील सुपरहिट गाणं ‘केसरिया’ तयार करणारी टीम - प्रीतम दादा, अमिताभ भट्टाचार्य आणि अरिजित सिंग - पुन्हा एकत्र आली आहे ‘आवन जावन’साठी.

अयान म्हणाले-"प्रीतम दादा. अमिताभ. अरिजित. हृतिक आणि कियाराची अफलातून केमिस्ट्री, जे पहिल्यांदाच एकत्र स्क्रीनवर दिसतील. आवन जावन आमच्या इटली शूटचं थीम साँग होते. हे गाणं तयार करताना आमच्या संपूर्ण टीमला प्रचंड आनंद आणि उत्साह मिळाला. हे गाणं लोकांपर्यंत पोहोचवण्याची उत्सुकता आता अधिकच वाढली आहे!"

कधी रिलीज होणार वॉर-२

वॉर २ हा यश राज फिल्म्स स्पाय युनिव्हर्सचा महत्त्वाचा भाग आहे आणि १४ ऑगस्ट रोजी हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये जगभरातील थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT