तथाकथित मल्टी-करोड बायोपिक घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीला अखेर कोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. अनेक महिन्यांपासून ते तुरुंगात होते.
filmmaker Vikram Bhatt and wife Shwetambari Bhatt get bail
प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नी श्वेतांबरी भट्ट यांना या प्रकरणात काहीसा दिलासा मिळाला आहे. कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपाखाली ते जोधपूरमधील तुरुंगात होते. हे संपूर्ण प्रकरण उदयपूरमधील चर्चित आयवीएफच्या संस्थापकाशी संबंधित आहे.
सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम. पंचोली यांच्या खंडपीठाने या खटल्याची सुनावणी केली. दोन्ही पक्ष परस्पर समझोत्यासाठी तयार असल्याचे दिसून आले. तक्रारदाराची बाजू वरिष्ठ वकील विकास सिंह यांनी मांडली. ते म्हणाले की, जर प्रकरण परस्पर कराराने सोडवले गेले तर आरोपीला जामीन देण्यास त्यांचा कोणताही आक्षेप नाही.
प्रकरण काय?
विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीवर तक्रारदाराला एका चित्रपट प्रोजेक्टमध्ये मोठी गुंतवणूक करायची होती. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, भट्ट दाम्पत्याने त्यांच्या दिवंगत पत्नीच्या जीवनावर आधारित बायोपिक बनवण्याच्या नावाखाली त्यांना ३० कोटींहून अधिक गुंतवणूक करण्यास सांगितले. या गुंतवणुकीच्या बदल्यात त्यांना मोठा नफा होणार असल्याचे आश्वासन दिले.
पण, ते आश्वासन अपूर्ण राहिले. तक्रारदाराने फसवणूक, बनावटगिरी आणि एकूण ४४.७ कोटी रुपयांच्या निधीचा गैरवापर केल्याचा गुन्हा दाखल केला होता. राजस्थान पोलिसांनी मोठी कारवाई करत मागील वर्षी डिसेंबरमध्ये मुंबईतून विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीला अटक केली होती. आता सुप्रीम कोर्टाने दोन्ही पक्षांना मध्यस्थीद्वारे हा वाद सोडवण्याचा प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत. दोन्ही पक्ष येत्या आठवड्यात मध्यस्थांसमोर हजर राहण्याची तयारी करत असल्याचे वृत्त समोर आले आहे.
हाय प्रोफाईल फसवणूक?
राजस्थान हायकोर्टाने विक्रम भट्ट यांना दिलासा नाकारला होता. त्यानंतर भट्ट यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. भट्ट यांच्या वकिलाने असा युक्तिवाद केला की, हा खटला दिवाणी स्वरूपाचा होता परंतु त्याला गुन्हेगारी वळण देण्यात आले.
आता हा खटला आता उदयपूरमधील कनिष्ठ कोर्टात जाईल. तिथे जामिनासाठीची औपचारिकता पूर्ण केली जाईल. बायोपिक प्रोजेक्ट आणि आर्थिक व्यवहारातील फसवणुकीमुळे हे प्रकरण हाय-प्रोफाईल मानले जात असून चित्रपट इंडस्ट्रीत त्याची चर्चा होत आहे.