पुढारी ऑनलाईन
बिग बॉस मराठीच्या (बिग बॉस M) घरामध्ये आज खूप दिवसांनी टीम B एकत्र बसून चर्चा करताना दिसणार आहे. ज्यामध्ये एक,दोन दिवसांपासून अजून एक सदस्य भरती झाला आहे आणि ती सदस्य म्हणजे गायत्री दातार. विशाल आणि विकास एकमेकांशी ग्रुपसमोर चर्चा करताना दिसणार आहेत. ज्यामध्ये विकासने ग्रुपला एक विनंती देखील केली आणि त्यानंतर सगळ्यांना हसू फुटले. (बिग बॉस M)
विशाल विकासला विचारताना दिसणार आहे. तू मला नॉमिनेट का करायला गेला होतास जयकडे ? विकास त्यावर म्हणाला, कारणं तू मला करत होतास. विशाल म्हणाला, मी तुझं नावं सुध्दा घेतला नाही. त्यावर विकास म्हणाला, मला जयने सांगितले. मीनल म्हणाली, खोटं बोलतो. विशाल म्हणाला, खोटं बोलायला कुठल्या शाळेत. विकास म्हणाला, त्याविषयी आपण बोलूया कॅमेरा ऑफ होऊ देत.
विशाल म्हणाला, त्यानंतर जयने बॉम्ब टाकला तो मला नॉमिनेट करायला आला. भाऊ बोलायलाचं आला नाही परत. त्यावर विकास म्हणाला, आम्ही तीन दिवस वाट बघत होतो तू येशील आमच्याकडे सॉरी बोलायला. विकासचे म्हणणे आहे, इथून पुढचा गेम अवघड होत जाणार आहे, तर कोणालाही नॉमिनेट करा मला नॉमिनेट करू नका. हे ऐकताच सगळ्यांना हसू फुटले. पहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.