vicky kaushal and katerina kaif wedding place sawai madhopur  
मनोरंजन

kat weds vicky : कसं आहे ‘सिक्स सेंस’ हॉटेल, जिथे होतंय शाही लग्न

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

बॉलीवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कॅटरीना कैफ (kat weds vicky) यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. ९ डिसेंबरला दोघांचे लग्न पार पडणार आहे. लग्नाचं आयोजन राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे करण्यात आलं आहे. तुम्हाला माहितीये का, सवाई माधोपूरची विशेषत: काय आहे? सवाई माधोपूरच्या सिक्स सेंस किल्ल्यामध्ये हे शाही लग्न (kat weds vicky) होतंय.

सवाई माधोपुर  हे महान चौहान शासक राणा हम्मीर देव चौहान आणि रणथंबोर राष्‍ट्रीय उद्यानासाठी ओळखलं जातं. वाघांसाठीही हे प्रसिध्द आहे. शिवाय मंदिरांसाठीही प्रसिद्ध आहे. सवाई माधोपूरचा इतिहास रणथंबोर किल्ल्याच्या अवतीभोवती फिरतो. विंध्य आणि आरवली पर्वतरांगांमध्ये रणथंबोर किल्ल्याचे सौंदर्य पाहता येते.

अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कॅटरीना कैफ यांचा विवाह साेहळा ७ ते ९ डिसेंबरपर्यंत आहे. ८ तारखेला मेहंदी सोहळा आहे. सवाई माधोपूरमध्य़े भव्य सिक्स सेंस फोर्ट बरवाडामध्ये लग्नाची तयारी सुरू आहे. हा किल्ला खूप सुंदर आहे.

या किल्ल्याची विशेषत: म्हणजे शक्ती, दुर्गम मार्ग शत्रुंपासून संरक्षण करतो. दिल्ली आणि आगराचे शासक येथे पोहोचण्यास असमर्थ होते. किल्ल्याचे सुंदर वास्तुशिल्प, तलाव आणि सरोवरे हे प्रेम आणि ज्ञान दर्शवतात. गणेश मंदिर, जैन मंदिर, बादल महल, जंवरा-भंवरा अन्नागार, दिल्ली दरवाजा, हम्मीर महल, हम्मीर कचहरी, तोरण द्वार,  सामंतांची हवेली, ३२ स्तंभ असणारी छत्री आणि मशिद अशा ऐतिहासिक वास्तूंनी सवाई माधोपूर नटलेलं आहे.

असा आहे सिक्स सेंस हॉटेल

किल्ल्याचेच रुपांतर हॉटेलमध्ये करण्यात आले होते. हे हॉटेल एक लक्झरी ब्रँड आहे. यामध्ये 30000 वर्ग फूट स्पा आणि फिटनेस सेंटर आहे. येथे येणाऱ्यांसाठी आयुर्वेदिक उपचार प्रणाली, ध्यान आणि अन्य खासगी कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून दिलं जातं.

हा किल्ला १४ व्या शतकातील आहे. ७०० वर्षे जुन्या या किल्ल्यामध्ये जीर्णोद्धाराचे काम पूर्ण करण्यासाठी एका दशकाहून अधिक काळ लागला. भिंतीच्या आत दोन महल आणि अनेक मंदिरे आहेत. हॉटेलमध्ये ४८ रॉयल सूट आहेत. सवाई माधोपुरच्या या किल्ल्यात एक रात्र थांबण्यासाठीचा दर ७७ हजार रुपये आहे.  टॅक्ससह  हा खर्च ९० हजार रुपये होते. हा खर्च केवळ एका रुमचा आहे. स्पेशल रूमचा एक रात्र थांबण्याचा दर ४ लाख ९४ हजार रुपये आहे. टॅक्स धरून ५ लाख ८ हजार रुपये खर्च होऊ शकतो.

photo – sixsensesfortbarwara insta वरून साभार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT