अभिनेत्री अंकिता जैनचा पती विकी जैनला हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे. विकी आणि अंकिता नुकतेच लाफ्टर शेफ्स 2 मध्ये दिसले होते. रिअलिटी शो स्टार आणि बिझनेसमॅन असलेल्या विकीची तब्येत बिघडल्याचे समोर येत आहे. विकिचा लाफ्टर शेफ्स मधील मित्र समर्थ जुरेल यांनी त्याचा हॉस्पिटलमधील व्हीडियो शेयर केला आहे. (Latest Entertainment News)
यामध्ये विकीच्या हाताला बँडेज गुंडाळले आहे. तो बेडवर असून दुसऱ्या हाताला सलाईन लावले आहे. त्याच्या बेडशेजारी अंकिता लोखंडे दिसते आहे. अर्थात विकी हा व्हीडियोमध्ये हसता खेळता दिसत असला तरी चेहऱ्यावर थकवा दिसून येतो आहे
अंकिताच्या फॅनपेजवर शेयर केलेल्या व्हीडियोमध्ये विकीच्या हातावर प्लास्टर दिसत आहे. यामध्ये अंकिताच्या चेहऱ्यावरील ताण स्पष्ट दिसत आहे. विकीचा असा व्हीडियो पाहून त्याच्या फॅन्सनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच अनेकांनी त्याला बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
समर्थ जुरेल त्याच्या व्हीडियोमध्ये म्हणतो, ‘भाई लवकर बरा हो' अर्थात विकीसोबत नेमके काय झाले आहे याबाबत सांगता येत नाही. पण एकंदरीत त्याची जखम बरीच मोठी असल्याचे समोर येत आहे.
विकी जैन आणि आणि अंकिता लोखंडे आतपर्यंत तीन रिअलिटी शोमध्ये दिसले आहेत. त्यापैकी हे दोघे सगळ्यात आधी बिग बॉसच्या 17 व्या सीझनमध्ये दिसले होते. त्यानंतर स्मार्ट जोडी आणि अगदी अलीकडेच लाफ्टर शेफ्स: अनलिमीटेड एंटरटेनमेंट या शोमध्येही दिसले आहेत. या जोडीच्या लग्नाला जवळपास 4 वर्षे पूर्ण झाले आहे.