

दक्षिण सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलेली अभिनेत्री म्हणजे अनुष्का शेट्टी. अनेक सिनेमात लक्षवेधी भूमिका केल्यानंतर अनुष्काच्या सोशल मीडिया पोस्टने चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अनुष्काने एक पोस्ट केली आहे. ज्यात तिने सोशल मिडियापासून ब्रेक घेण्याबाबत लिहिले आहे. एका साध्याश्या डायरीतील पानावर हस्ताक्षरात हा मेसेज लिहिलेला आहे. (Latest Entertainment News)
या मेसेजमध्ये ती म्हणते, ‘ सोशल मीडियापासून काही काळ लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. स्क्रोलिंगच्या पलीकडच्या जगाशी आणि कामाशी पुन्हा जोडले जाण्यासाठी जिथे आपल्या सगळ्यांची खरी सुरुवात होते.
खूप गप्पा आणि खूप प्रेम घेऊन तुमच्या सगळ्यांशी लवकरच भेट होईल. आनंदी रहा.. खूप प्रेम.. अनुष्का शेट्टी.
अनुष्काच्या या निर्णयावर चाहत्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. काहीनी तिच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. काहीनी तिला लवकर परत येण्याबाबत विनंती केली आहे.
अनुष्काची मुख्य भूमिका असलेला घाटी हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमात तिच्यासोबत विक्रम प्रभू, जगपती बाब, राघव रुद्र मूलपुरु, जिशू सेनगुप्ता, जॉन विजय आणि विजय रवींद्र यांच्या भूमिका आहेत.
या सिनेमाची रिलीज डेट जवळपास 2 वेळा बदलली होती.
सर्वप्रथम हा सिनेमा 18 एप्रिलला रिलीज होणार होता, पण 11 जुलैपर्यंत त्याचे प्रदर्शन पुढे ढकलले.
तीही रिलीज डेट बदलून अखेर हा सिनेमा 5 सप्टेंबरला रिलीज झाला आहे.
खरे तर घाटीच्या माध्यमातून जवळपास दोन वर्षांनी अनुष्काने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आहे. यापूर्वी ती 2023 च्या मिस शेट्टी मिस्टर पॉलिशेट्टी या सिनेमात दिसली होती.