Varanasi Mahesh Babu's look viral  Pudhari photo
मनोरंजन

Varanasi Mahesh Babu's look| ‘वाराणसी’मध्ये महेश बाबूचा रुद्र अवतार! आफ्रिकेच्या जंगलात दिसला दमदार लूक

Varanasi Mahesh Babu's look| ‘वाराणसी’मध्ये महेश बाबूचा रुद्र अवतार! आफ्रिकेच्या जंगलात दिसला दमदार लूक

पुढारी वृत्तसेवा

एस. एस. राजामौली यांच्या बहुप्रतीक्षित ‘वाराणसी’ चित्रपटातील महेश बाबूंच्या ‘रुद्र’ भूमिकेचा दमदार लूक समोर आला आहे. आफ्रिकेच्या जंगलाच्या पार्श्वभूमीवर दिसणाऱ्या महेश बाबूंच्या या रुद्र अवताराने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.

एस. एस. राजामौली यांच्या बहुप्रतीक्षित ‘वाराणसी’ या पॅन-इंडिया चित्रपटाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. महेश बाबू, प्रियांका चोप्रा आणि पृथ्वीराज सुकुमारन यांची प्रमुख भूमिका असलेला अॅक्शन-अॅडव्हेंचर चित्रपटातून महेश बाबूंचा ‘रुद्र’ या व्यक्तिरेखेतील पहिला लूक समोर आला आहे. महेश बाबू यांच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी हा खास लूक फॅन्ससोबत शेअर केला. फोटो समोर येताच सोशल मीडियावर महेश बाबूंच्या नव्या अंदाजाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

‘वाराणसी’ हा चित्रपट ७ एप्रिल, २०२७ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाला ऑस्कर विजेते संगीतकार एम. एम. कीरावानी यांचे संगीत लाभले आहे. कथा, भव्य लोकेशन्स आणि मोठ्या स्टारकास्टमुळे हा चित्रपट भारतीय सिनेमातील महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टपैकी एक मानला जात आहे.

आफ्रिकेच्या जंगलात दिसला रुद्र

चित्रपटाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर महेश बाबूंचे दोन फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये महेश बाबू दाढीच्या लूकमध्ये दिसत असून, त्यांचा पोशाखही अगदी साधा आणि आउटडोअर अॅडव्हेंचरला साजेसा आहे.

एका फोटोमध्ये महेश बाबू आफ्रिकेतील निसर्गरम्य परिसरात उभा असल्याचे दिसतो. त्यामुळे हा फोटो एखाद्या मोठ्या अॅडव्हेंचर सिनेमातील दृश्य असल्याचे दिसते. दुसऱ्या फोटोमध्ये तो दाट हिरवाईने वेढलेल्या परिसरात बांबूच्या तराफ्यावर निवांत बसलेला दिसतो. या फोटोंमधून ‘रुद्र’ ही व्यक्तिरेखा धाडसी अभिनयावर आधारितअसल्याचे दिसते. पण याची नेमकी कथा काय, याबाबत माहिती अद्याप गुप्त ठेवण्यात आली आहे.

किलिमंजारो ते मसाई मारा; आफ्रिकेत झाले शूटिंग

मीडिया रिपोर्टनुसार, ‘वाराणसी’च्या टीमने आफ्रिकेतील अनेक भव्य ठिकाणी शूटिंग केले आहे. यामध्ये माउंट किलिमंजारो आणि मसाई मारा यांसारख्या प्रसिद्ध परिसरांचा समावेश आहे. याच शेड्युलदरम्यान महेश बाबूंचे हे फोटो टिपण्यात आले.

राजामौली यांनी या लोकेशन्सबद्दल बोलताना सांगितले की, आफ्रिकेच्या भूमीने चित्रपटाला असा नैसर्गिक आणि भव्य अनुभव दिला, जो कोणत्याही स्टुडिओ सेटवर तयार करणे शक्य झाले नसते. किलिमंजारो आणि मसाई मारा येथे शूटिंग करताना मिळालेली दृश्ये पाहून ते स्वतःही थक्क झाल्याचे त्यांनी सांगितले.

एस एस राजामौली काय म्हणाले?

"रुद्रचा जन्म स्वतःपेक्षाही मोठ्या उद्देशाची पूर्तता करण्यासाठी झाला आहे. तो विनोदी आहे, संवेदनशील आहे आणि तितकाच आक्रमकही आहे. महेश बाबू यांनी या भूमिकेत हे सर्व गुण उत्तमरीत्या उतरवले आहेत. आक्रमक भूमिका कोणीही साकारू शकते; पण एकाच वेळी आक्रमकता आणि संवेदनशीलता (नाजूकपणा) दाखवणे फार कमी जणांना जमते."

ते पुढे म्हणाले, "हे फोटो आमच्या आफ्रिकेतील शूटिंगदरम्यानचे आहेत आणि त्या भूमीने आम्हाला असे काही दिले जे कोणताही सेट देऊ शकला नसता. किलिमंजारो आणि मसाई मारा परिसरात शूटिंग करताना मी थक्क झालो होतो. काही सकाळच्या वेळी मला असे वाटायचे की, आमच्या समोर जे दृश्य आहे ते १.४३:१ च्या आयमॅक्स (IMAX) फ्रेममध्येही सामावू शकणार नाही."

महेश बाबूचा रुद्र अवतार समोर आल्यानंतर फॅन्सच्या पसंतीस पडला आहे. फॅन्समध्ये ‘वाराणसी’बद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. महेश बाबूसोबत प्रियांका चोप्रा आणि पृथ्वीराज सुकुमारन यांची स्टारकास्ट, राजामौलींचे दिग्दर्शन, आफ्रिकेतील भव्य लोकेशन्स आणि एम. एम. कीरावानी यांचे संगीत यामुळे चित्रपट हिट होईल, असे म्हटले जात आहेएप्रिल २०२७ रोजी ‘वाराणसी’ जगभरातील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT