Lopamudra Raut theft case - बिग बॉस फेम लोपामुद्रा राउतच्या घरात 76 लाखांची चोरी; फरार चोरट्याला बिहारमधून अटक

Lopamudra Raut theft case - बिग बॉस फेम लोपामुद्रा राउतच्या घरात 76 लाखांची चोरी; फरार चोरट्याला बिहारमधून अटक
Lopamudra Raut
Lopamudra Raut theft casePudhari pic
Published on
Updated on
Summary

बिग बॉस फेम अभिनेत्री लोपामुद्रा राउतच्या घरात तब्बल 76.39 लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. घरातून रोकड आणि सोन्याचे दागिने असा लाखोंचा ऐवज घेऊन आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीचा बिहारपर्यंत माग काढला आणि त्याला अटक केली. आरोपीकडून चोरीतील लाखोंचा ऐवजही जप्त करण्यात आला आहे.

‘बिग बॉस’मुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आणि मॉडेल लोपामुद्रा राउत सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, लोपामुद्राच्या मुंबईतील घरातून तब्बल 76.39 लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. या प्रकरणातील चोरी करून फरार झालेल्या आरोपीला मुंबई पोलिसांनी बिहारमधील दरभंगा येथून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या मुद्देमालापैकी 51 लाख रुपयांहून अधिक किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

Lopamudra Raut
Collection | ‘Spider-Man: Brand New Day’च्या तुफान क्रेझमध्येही ‘The Odyssey’ची दमदार कमाई; २४ दिवसांत १६६.८९ कोटींचा गल्ला

मुंबईतील सांताक्रूझ परिसरात लोपामुद्राचे घर आहे. काही कामानिमित्त ती घराबाहेर असताना जुलै महिन्यात तिच्या घरात चोरी झाल्याचे समोर आले होते. घरातून महागडे सामान, रोख रक्कम आणि सोन्याचे बिस्किटे चोरीला गेले होते. चोरी झालेल्या वस्तूंमध्ये महागड्या घड्याळासह सोन्याचे दोन बिस्किटे, रोख पैसे आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश असल्याचे सांगण्यात येते.

मोबाईल फोनचे तपशील आणि लोकेशन-आधारित माहितीसह तांत्रिक माहितीचा वापर करून पोलिसांनी त्याचा शोध घेतला. तपासादरम्यान दरभंगाचा धागा मिळाल्यावर, मुंबई पोलिसांचे एक पथक तिथे गेले आणि दरभंगा पोलिसांच्या मदतीने त्यांनी सोनकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ठिकाणी छापा टाकला.

Lopamudra Raut
Spider Man Brand New Day: स्पायडर-मॅनचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; 8 दिवसांत कमाईचा नवा विक्रम, मोठ्या सिनेमांनाही टाकलं मागे

पोलिसांनी सांगितले की, चोरीला गेलेली संपूर्ण रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू अद्याप हस्तगत करायच्या बाकी आहेत. या चोरी प्रकरणात आणखी कोण सामील होते का, याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांना संशय आहे की, त्याने चोरीच्या पैशांपैकी काही रक्कम वापरून आपल्या बहिणीच्या नावे दोन गुंठे जमीन खरेदी केली होती.

मीडिया रिपोर्टनुसार, हा चोर बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील एका गावातील २६ वर्षीय तरुण आहे. चंदन मुखिया असे त्याचे नाव आहे. त्याने बांबूच्या काठीचा वापर करून पाचव्या मजल्यावरील बाल्कनीत प्रवेश केला आणि त्यानंतर दरवाजा तोडून लोपामुद्राच्या बेडरूममध्ये घुसून मौल्यवान वस्तूंची चोरी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news