पुढारी ऑनलाईन डेस्क
साऊथ सुपरस्टार अजित कुमार, कार्तिकेय आणि हुमा कुरैशी यांचा चित्रपट वलीमाई रिलीज झाला आहे. कोविडमुळे या चित्रपटाची रिलीज डेट अनेकवेळा पोस्टपोन केली गेली. चित्रपटामध्ये सुपरस्टार अजित कुमार पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. एच विनोथ द्वारा दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांची आहे. नेहमीप्रमाणे या साऊथ सुपरस्टारने आपल्या ॲक्शन आणि अभिनयाने सर्वांचचं लक्ष वेधून घेतलं आहे. तुम्हाला माहितीये का, हा साऊथ स्टार अजित कोण आहे, जाणून घेऊया त्याच्याविषयी या गोष्टी.
अजितशिवाय या चित्रपटामध्ये कार्तिकेय, हुमा आहे. कार्तिकेय खतरनाक खलनायकाची भूमिका केलीय. तर हुमा कुरैशी एक सहाय्यक भूमिकेत आहे. तसेच जीएम सुंदर या अभिनेत्याचाही सुंदर अभिनय पाहायला मिळते.
अजित कुमारचा जन्म १ मे, १९७१ रोजी हैदराबादमधील सिंकदराबाद येथे झाला होता. साऊथमध्ये अजित इतकी क्रेझ आहे की, त्याचा चित्रपट रिलीज झाल्याबरोबर चित्रपटगृहे खचाखच गर्दीने भरली जातात.
अजित कुमारला साऊथमध्ये लोक प्रेमाने थाला अजित म्हणून ओळखतात. याचा अर्थ होतो- नेतृत्व करणारा किंवा लीडर किंवा मुखिया. अजितनेदेखील आपल्या करिअरची सुरुवात अन्य सुपरस्टार्स जसे कमल हासन, आमिर खान आणि ऋतिक रोशनप्रमाणे बालपणापासून केली होती. अजितने अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून भूमिका साकारली होती.
अजित १९९० मध्ये तमिळ चित्रपट 'एन विदु एन कानावर'च्या एक गाण्यात दिसला होता. यामध्ये तो एका शाळकरी मुलाच्या भूमिकेत होता. सर्वांना वाटते की अजितचा चित्रपट १९९३ मध्ये रिलीज झालेला 'अमरावती' होय. पण, त्याची सुरुवात १९९२ मध्ये रिलीज झालेला चित्रपट 'प्रेमा पुष्पकम' नावाचा तेलुगु चित्रपटातून झाली होती. या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची शूटिंगवेळी मृत्यू झाला होता. 'प्रेमा पुष्पकम' तेलुगु मध्ये अजितचा एकमेव चित्रपट होता.
अजितचा आणखी एक इंटरेस्टींग किस्सा आहे. त्यांच्या दोन चित्रपटांना कुण्या दुसऱ्या सुपरस्टारने डब केलं होतं. तो दुसरा कुणी सुपरस्टार नसून विक्रम होता. तेव्हा विक्रम स्ट्रगल करत होता. त्याने अजितचा फिल्म 'अमरावती' आणि 'पसमलारगल' मध्ये डबिंग केलं होतं. यानंतर दोघांनी 'उल्लासम' नावाच्या चित्रपटात एकत्र काम केलं होतं.
चित्रपट 'राजाविन परवैयले' मध्ये अजित आणि अभिनेता विजय एकत्र दिसले होते. या चित्रपटामध्ये थाला छोट्या भूमिकेत होता. त्याने विजयच्या मित्राची भूमिका साकारली होती. यानंतर तो वसंतच्या 'नेर्रुकु नेर'मध्ये पुन्हा एकत्र काम करताना दिसला. १८ दिवस शूटिंग करून तारखेच्या समस्येमुळे अजित या चित्रपटातून बाहेर गेला. त्याच्या जागी सूर्याने काम केलं.
चेन्नईमध्ये एका कार्यक्रमात शाहरुख खानने अजितविषयी बोलताना म्हटले होते की, त्याला कुठलाही अंदाज नव्हता की, त्याचा सहकलाकार किती मोठा स्टार आहे. शूटिंगवेळी अजितची खूप साधी राहणीमान असायची. दोन्ही सुपरस्टार्सनी चित्रपट 'अशोका'मध्ये एकत्र काम केले होते. अजितने अशोकाच्या सावत्र छोटे भावाची भूमिका साकारली होती.
अजितने चित्रपट 'अमरकमल'ची सहकलाकार शालिनीशी २४ एप्रिल, २००० मध्ये लग्न केले होते. शालिनीदेखील साऊथ चित्रपटांची चर्चित अभिनेत्री आहे. दोघांना दोन मुले अद्विक आणि मुलगी अनुष्का आहे.
शाळा सोडल्यानंतर अजितने कार रेसिंगमध्ये आपलं करिअर बनवलं होतं. तो २००४ मध्ये ब्रिटनमध्ये आयोजित फॉर्म्युला सीजन-३ मध्ये फॉर्म्युला-२ रेसर म्हणून भाग घेतला होता. या स्पर्धेत अजितने तिसरे स्थान मिळवले होते. अभिनय आणि कार रेसिंग शिवाय तो एक ट्रेंड पायलटदेखील आहे, ज फायटर जेटदेखील चालवतात. अजित आपल्या घरात विमानाचे मॉडल स्वत: तयार करतो. अजितला बाईकची आवडदेखील आहे. तो अनेक कलेक्शनचा मालकदेखील आहे.
चित्रपटाची सुरुवात होते-एका चेन स्नॅचिंग घटनेने. एक मास्क मॅनने ही चोरी केलेली असते. सर्व नागरिक पोलिस फोर्सकडे उत्तर मागत असतात. पण, त्यांना स्वत: याविषयी अधिक माहिती नसते. हे गुन्हे सोडवण्यासाठी सुपर कॉपला बोलावलं जातं. यानंतर मदुराईचा सीन येतो, जेथे एक मर्डर होतो. यानंतर एसीपी अर्जुन (अजित कुमार) ला इंट्रोड्यूस केलं जातं.
अजितची शिट्टी मारून एन्ट्री होते. अर्जुनला पुन्हा चेन्नई शिफ्ट केलं जातं. तो एका आत्महत्येच्या केसचा तपास करतो, ज्याचं कनेक्शन चेन स्नॅचिंग आणि ड्रग स्मगलिंगशी होतं.
यानंतर जेव्हा या गुन्ह्याचा मास्टरमाईंड (कार्तिकेय गुम्माकोंडा) ला याविषयी समजते. तेव्हा दोघांमध्ये क्लॅश होतं, हीच गोष्ट कहाणीला पुढे नेतं. आता अर्जुनचा परिवारदेखील मध्ये येतं. आता अर्जुन या गुन्हेगारांपासून शहर आणि आपल्या परिवाराला वाचवू शकेल, हे चित्रपट पाहिल्यानंतरच समजेल.