pa ranjith : काला चित्रपट दिग्दर्शक पा रंजित यांचा बॉलिवूडमध्ये डेब्यू | पुढारी

pa ranjith : काला चित्रपट दिग्दर्शक पा रंजित यांचा बॉलिवूडमध्ये डेब्यू

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : कबाली, काला सारखे चित्रपट बनवणारे साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक पा रंजित ( pa ranjith ) आता बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यास सज्ज झाले आहेत. शरीन मंत्री आणि किशोर अरोरा यांच्या नमह पिक्चर्सने दिग्दर्शक पा रंजित यांच्याशी हातमिळवणी केली आहे. त्याचा आगामी प्रोजेक्ट ‘बिरसा’ हा पा रंजित यांचा बॉलिवूड मधील डेब्यू असेल. आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असेल. निर्माते या वर्षाच्या अखेरीस या चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात होईल.

बिरसा मुडा यांच्या जीवनाविषयी माहिती गोळा करण्यासाठी टीमने झारखंड आणि बंगालचा मोठ्या प्रमाणावर दौरा केला आहे आणि स्क्रिप्टला अंतिम रूप दिले आहे. आत्तापर्यंत न पाहिलेला अॅक्शन ड्रामा तसेच न पाहिलेले लोकेशन्सवर मोठ्या प्रमाणावर शूटींग केले जाणार आहे. अशा प्रकारे पा रंजित ( pa ranjith ) पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी अर्थपूर्ण मनोरंजन घेऊन येत आहे.

आपल्या बॉलीवूड पदार्पणाबद्दल पा रंजित ( pa ranjith ) म्हणाले, ‘माझ्या पहिल्या हिंदी चित्रपटासाठी मी यापेक्षा चांगला प्रोजेक्ट निवडू शकलो नसतो. चित्रपटाच्या मागे स्क्रिप्टिंग आणि संशोधनाची खूप समृद्ध प्रक्रिया आहे. जीवन आणि स्वातंत्र्यासाठी बिरसा मुंडा यांच्या दृढ विश्वासाने मी प्रेरित झालो आहे. संशोधन आणि स्क्रिप्टिंग प्रक्रियेदरम्यान संयम बाळगल्याबद्दल मी निर्मात्यांचे आभार मानू इच्छितो.

चित्रपटाबद्दल बोलताना निर्माते शरीन मंत्री म्हणाले, “नम: पिक्चर्समध्ये, आम्हाला मनोरंजन आणि प्रेरणा देणाऱ्या कथा सांगायला आवडतात. टीमने चित्रपटासाठी विस्तृत संशोधन केले आहे आणि बिरसा मुंडा यांची कथा मोठ्या प्रमाणात जिवंत करण्याचे आमचे ध्येय आहे. निर्माते किशोर अरोरा म्हणाले, ‘बिरसा मुंडा यांची क्रांतीची गोष्ट अनेकांना धैर्य दाखवते. दिग्दर्शक म्हणून बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी रंजितसोबत काम करताना आम्हाला आनंद होत आहे. 2021 चा तमिळ ब्लॉकबस्टर स्पोर्ट्स अॅक्शन चित्रपट सरपट्टा परंबराई नंतर ‘बिरसा’ हा पा रंजीत यांचा पहिला हिंदी चित्रपट आहे. हा बायोपिक झारखंडमधील आदिवासी नेता बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित असेल, ज्यांनी 19 व्या शतकात ब्रिटीश वसाहतवादी अत्याचारा विरोधात बंड उभे केले होते.

Back to top button