urvashi rautela 
मनोरंजन

urvashi rautela : उर्वशीचा चमचमता ड्रेस ४० लाखांचा, खूर्चीवर बसण्यासाठी मिळाले इतके कोटी…

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाला ( urvashi rautela ) मिस युनिव्हर्स २०२१ स्पर्धेची परीक्षक होण्याचा मान मिळाला.  इस्राइल येथे पार पडलेल्‍या कार्यक्रमात तिने ४० लाखांच्या ड्रेस घातला. तर परीक्षक म्हणून खुर्चीवर बसण्यासाठी ८ कोटी रूपये घेतले होते. यामुळे जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

नुकतेच भारताच्या २१ वर्षीय हरनाज संधू हिने मिस युनिव्हर्स २०२१ (Miss Universe 2021) चा किताब जिंकला. ही स्पर्धा इस्राइलमधील इलात येथे पार पडली. या स्पर्धेत भारताचे नेतृत्व उर्वशी रौतेलाने ( urvashi rautela ) केलं. या स्पर्धेत तिला परीक्षक होण्याचा मान मिळाला. यावेळी उर्वशीने हॉल्टर डीप नेक आणि ऑफ शोल्डर चमकदार काळ्या- निळ्या रंगाच्या ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसच्या किमंत ४० लाख रूपये असल्याने सोशल मीडियात चर्चा सुरू झाली. या ड्रेसमध्ये ती खूपच ग्लॅमरस आणि सुंदर दिसत होती. स्मोकी ब्लॅक आय लूक, ग्लॉसी बेस आणि पिंक ग्लॉसी लिपस्टिक तिच्या सौंदर्यात आणखीण भर घालत होती.

उर्वशीचा ४० लाखांचा ड्रेस

उर्वशी रौतेलाने मिस युनिव्हर्स २०२१ स्पर्धेत मायकेल सिन्कोचा यांनी डिझाईन केलेल्या काळ्या- निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. या ड्रेसची किंमत ४० लाख रूपये होती. याशिवाय उर्वशीला जजच्या खुर्चीवर बसण्याचे मानधन म्हणून १.२ मिलियन डॉलर्स म्हणजे, ८ कोटी रूपये मिळाले. ही रक्कम एखाद्या चित्रपटापेक्षाही अधिक आहे.

उर्वशीच्या या ड्रेसचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहते ड्रेसच्या किमंतीवरून अवाक झाले आहेत. उर्वशी अभिनयासोबत सौंदर्य आणि जबरदस्त फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. ती नेहमी हटके स्टाईल आणि महागड्या ड्रेसचे फोटो शेअर करून सोशल मीडियावर सक्रिय असते. याशिवाय तिचे सोशल मीडियावर ४४ दक्षलशहून अधिक फालोअर्स आहेत.

याशिवाय नुकतेच ती सोनेरी रंगाच्या गाऊनमध्ये एका व्हिडिओत दिसली. या व्हिडिओतून तिने चाहत्यांनी ख्रिसमसच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. सोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'ख्रिसमसची जादू हवेत आहे. हा चमकण्याचा दिवस आहे. तुम्ही ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला आकाश शोधण्याइतके मोठे होऊ शकत नाही. त्यामुळे घरातच बर्फाची जागा बनवा. आणि ख्रिसमस (२५ डिसेंबर) संस्मरणीय बनवा.'

याआधी उर्वशीने मिस युनिवर्स स्पर्धेत २०१५ साली भारताचं प्रतिनिधित्व केले होतं. याशिवाय तिने २०१५ मध्ये 'मिस डिवा युनिवर्स' किताब देखील मिळवला होता. उर्वशीने 'सिंग साब द ग्रेट' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा पदार्पण केलं आहे. त्यानंतर ती "सनम रे', 'ग्रेट गँड मस्ती', 'हेट स्टेरी 4' आणि 'पागलपंती' अशा अनेक चित्रपटांमध्ये दिसली.

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT