Urvashi Rautela opens on nandmuri balkrishna  pudhari photo
मनोरंजन

Urvashi Rautela |दबिडी-दबिडी’ गाण्यातील वादग्रस्त स्टेप्सवर अखेर उर्वशीने सोडले मौन; बालकृष्ण नंदमुरींबद्दल म्हणाली...

Urvashi Rautela |अखेर उर्वशी रौतेलाने सोडले मौन; दबिडी-दबिडी गाण्यातील 'त्या' वादग्रस्त स्टेप्सनंतर बालकृष्ण नंदमुरीबद्दल 'त्या' गोष्टी सांगितल्याच!

स्वालिया न. शिकलगार

‘दबिडी-दबिडी’ गाण्यातील कथित वल्गर डान्स स्टेप्समुळे उर्वशी रौतेला आणि बालकृष्ण नंदमुरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले होते. या वादानंतर उर्वशीने पहिल्यांदाच मौन सोडत बालकृष्णांविषयी सकारात्मक भावना व्यक्त केल्या. तिने या गाण्यावरील प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांचा आदर करताना कलाकार म्हणून विविध प्रकारच्या भूमिकांचा स्वीकार करावा लागतो, असेही सांगितले.

अभिनेता नंदमुरी बालकृष्णने 'डाकू महाराज' चित्रपटात दबिडी दबिडी गाण्यात उर्वशी रौतेला सोबत वल्गर स्टेप्स केले होते. ज्यामुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता बालकृष्ण नंदमुरी आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला यांचे ‘दबिडी-दबिडी’ हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आले होते. फारच विचित्र डान्स स्टेप्सवरून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या.

अनेकांनी या स्टेप्सना ‘वल्गर’ म्हटले, तर काहींनी कलाकारांवर टीकाही केली होती. यानंतर आता एका बातचीतमध्ये उर्वशीने आपले मौन सोडले आहे. तिने नंदमुरी बालकृष्ण यांच्याशी संबंधित वाद, ‘दबिडी दिबिडी’ गाण्यावर झालेली टीका, नंदमुरीच्या सेटवरील वागण्याबद्दल आणि सार्वजनिक वर्तणुकीबद्दलही भाष्य केले आहे.

एका मुलाखतीदरम्यान उर्वशी विचारण्यात आले की, प्रत्येक गाणे आणि भूमिका ही मनोरंजनाच्या दृष्टीने केली जाते. कलाकार म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करणे आवश्यक असते आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया देखील तितक्याच महत्त्वाच्या असतात. तिने स्पष्ट केले की, कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता.

उर्वशी रौतेलाने नंदमुरी बालकृष्ण यांच्यासोबतच्या झालेल्या सोशल मीडियावरील टीकेवर आणि प्रतिक्रियांवर आपले मत मांडले आहे. उर्वशी म्हणाली की, दबिडी दबिडी गाण्यानंतर वाद आणखी वाढत गेला. परिस्थिती हळूहळू चिघळत गेली. "मला नक्की सांगता येणार नाही... पण कधीकधी असे घडते की, एका गोष्टीमुळे दुसरी गोष्ट उद्भवते, मग तिसरी, चौथी... अगदी तसेच काहीसे याबाबतीतही घडले."

उर्वशीने बालकृष्ण नंदमुरी यांच्याबद्दल म्हणाली, या चित्रपटात ‘दबिडी दिबिडी’ हे गाणे समाविष्ट होते, ज्याला सोशल मीडियावरून नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. यावेळी उर्वशीने बालकृष्ण नंदमुरी यांचेही कौतुक केले. ती म्हणाली की, बालकृष्ण हे अत्यंत अनुभवी आणि मेहनती कलाकार आहेत. सेटवर त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता, असेही तिने नमूद केले.

‘दबिडी-दबिडी’ गाणे प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक मीम्स आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. काहींनी या गाण्याचे समर्थन केले, तर अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली. विशेषतः डान्स कोरिओग्राफीवरून मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, या वादानंतरही गाण्याला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळाले आणि ते ट्रेंडिंगमध्येही राहिले. आता तर उर्वशीने नंदमुरी यांच्याबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याने पुन्हा चर्चा होऊ लागलीय.

एका पॉडकास्टमध्ये राधिका आपटेने धक्कादायक खुलासा केला होता. एका चित्रपटावेळी तिची प्रकृती बिघडल्याने ती झोपली होती. राधिकाने सांगितले की ती नंदमुरीला ओळखत नव्हती. नंदमुरी आत आल्यानंतर राधिका आपटेच्या पायाला गुदगुदी करतो. हा प्रकार पाहून तिला अस्वस्थ वाटले आणि तिने नंदमुरीला हा प्रकार पुन्हा न करण्याचा सल्ला दिला होता.

बालकृष्ण हे अनेकदा वादामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, २०१७, २०२१ मध्ये नंदमुरीने आपल्या एका फॅनला जोरदार थप्पड लगावले होते. फॅनने कॅमेरा त्याच्याकडे वळवल्यानंतर ही घटना घडली होती. सर्वात चर्चेतल वाद म्हणजे, अभिनेत्री अंजलीला एका कार्यक्रमात स्टेजवर धक्का दिला होता. हा व्हिडिओ इंटरनेटवर खूप व्हायरल झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT