urfi javed  
मनोरंजन

Urfi Javed: उर्फीचा दगडगोट्यांपासून बनवलेला ड्रेस व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच तिच्या खास फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. उर्फी जावेदचे (Urfi Javed) फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. कधीकधी तिला ट्रोलही केले जाते. बर्‍याच वेळा उर्फीला तिच्या पोस्टवर असभ्य कमेंटही केल्या जातात. काही वेळा तिला धमक्याही दिल्या जातात. दरम्यान, अशाच एका ट्रोलरला उत्तर देण्यासाठी उर्फीने पुन्हा काहीतरी वेगळे केले आहे. (Urfi Javed)

पोस्ट काय आहे?

उर्फी जावेदने इन्स्टावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी जावेद पहिल्यांदा सामान्य कपड्यांमध्ये दिसत आहे आणि खाली एका कमेंटचा स्क्रीनशॉट आहे, ज्यावर लिहिले आहे – तिला दगडाने मारले पाहिजे. पण, दुसऱ्या क्षणी उर्फी चमकदार आणि वेगवेगळ्या रंगाच्या दगडांनी बनविलेले ड्रेस परिधान करताना दिसतेय. उर्फी या स्टाईलमध्ये खूपच स्टायलिश दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना उर्फीने कॅप्शनही लिहिले आहे.

उर्फीने तिच्या इन्स्टा व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हो, या कमेंटने मला असे करण्यास भाग पाडले. मला दोष देऊ नका, या कमेंटला दोष द्या.' उर्फीचा हा व्हिडिओ सोशल मीडिया यूजर्सना खूप पसंत केला जात आहे. पुन्हा एकदा उर्फी वाहवा लुटत आहे. उर्फीच्या पोस्टवर काही सेलिब्रिटींनी कमेंटही केल्या आहेत.

उर्फी जावेदने याआधी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये उर्फीने आपल्या कपड्यांसोबत वेगवेगळे प्रयोग देखील केले आहेत. विचित्र फॅशनचे कपडे घालण्यासाठी उर्फी प्रसिध्द आहे. त्यामुळेच ती नेहमी चर्चेत असते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT