मनोरंजन

उपेंद्र लिमये यांच्या ‘रोप’ चित्रपटाचा दगडूशेठ गणपती मंदिरात मुहूर्त सोहळा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुण्यातील पूज्य दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित एका सोहळ्यात 'रोप' या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. अभिनेते उपेंद्र लिमये यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मुहूर्त पार पाडला. यावेळी उपेंद्र लिमये यांनी 'रोप'च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्याला अभिनेते उपेंद्र लिमये, निर्माते साईनागराज आणि सौ. श्रुजना, दिग्दर्शक सूर्या, श्रुती शेट्टी, कपिल गुडसूरकर, श्री ऋषभ मोरे, बालकलाकार धृती इ. कलाकार मंडळी, कार्यकारी निर्माते कपिल जोंधळे, प्रॉडक्शन डिझायनर नेरंगलवार राज गौड, प्रोडक्शन मॅनेजर बाबासाहेब पाटील, कथालेखक बी. सुदर्शन, संवादलेखक संजय नवगिरे, संगीत दिग्दर्शक राजवीर गांगजी, कलादिग्दर्शक प्रकाश शिनगारे, धनंजय साबळे, सहदिग्दर्शक आशिष पवार, महेंद्र गाजभरे, कॉस्च्युम डिझायनर अर्चना बुक्कावार, गीतकार मंदार चोळकर, पब्लिसिटी डिझायनर जय कुंभारे उपस्थित होते.

निर्माते नागराज आणि सौ. सृजना, धृती यांनी चित्रपटाबाबत उत्साह व्यक्त करताना एक चांगली कलाकृती रसिक दरबारी सादर करण्याचा त्यांचा मानस असल्याचे यावेळी सांगितले. या सिनेमात प्रेक्षकांना आवडणारं सारं काही आहेच, पण त्या जोडीला एक सशक्त कथानकही आहे.

SCROLL FOR NEXT