Avatar: Fire And Ash advance booking updates  instagram
मनोरंजन

Avatar: Fire And Ash : रिलीजपूर्वीच ॲडव्हान्स बुकीगचा धुमाकूळ, सर्वात मोठा हॉलिवूड ओपनर ठरणार 'अवतार: फायर अँड ॲश'

Avatar: Fire And Ash : रिलीजपूर्वीच ॲडव्हान्स बुकींगचा धुमाकूळ, सर्वात मोठा हॉलिवूड ओपनर ठरणार 'अवतार: फायर अँड ॲश'

स्वालिया न. शिकलगार

‘अवतार: फायर अँड ॲश’ या बहुप्रतिक्षित हॉलिवूड चित्रपटाने रिलीजपूर्वीच ॲडव्हान्स बुकींगमध्ये प्रचंड धुमाकूळ घातला आहे. जगभरातील सिनेमागृहांमध्ये तिकिटांसाठी प्रेक्षकांची झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळत असून, हा चित्रपट सर्वात मोठा हॉलिवूड ओपनर ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Avatar: Fire And Ash advance booking before release

बॉक्स ऑफिसवर रिलीजपूर्वी अवतार: फायर अँड ॲशचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ३० कोटी रुपयांचे ओपनिंग निश्चित असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून २०२५ वर्षातील सर्वात मोठा हॉलिवूड ओपनर लवकरच येत आहे.

रिलीज तारीख : १९ डिसेंबर, २०२५

भाषा: हिंदी, इंग्लिश, तमिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड

मिळालेल्या माहितीनुसार, १२ डिसेंबर रोजी 'अवतार: फायर अँड ॲश' चित्रपटाची ३०,५०० तिकिटे विकली गेली आहेत. देशातील मल्टिप्लेक्समधील ही तिकिटांची नोंद आहे. अन्य ब्रँड थिएटर्समध्ये २४,००० तिकिटे विकली गेली आहेत. इतर नोंदीमध्ये ६,५०० तिकिटे विकली आहेत. असे तिन्हीही मल्टिप्लेक्स चेनमध्ये चित्रपटाच्या पहिल्या आठवड्यासाठी तब्बल ८०,००० तिकिटे विकली गेली आहेत.

रिलीजपूर्वीच हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. या आकड्यावरून शक्यता वर्तवण्यात आलीय की, 'अवतार: फायर अँड ॲश' हा चित्रपट त्याच्या आधीच्या 'अवतार: द वे ऑफ वॉटर' (२०२२) प्रमाणेच दमदार ओपनिंगसाठी तयार आहे.

चित्रपट समीक्षक असाही अंदाज वर्तवत आहेत की, 'अवतार: फायर अँड ॲश' हा चित्रपट देशातील या वर्षातील सर्वात मोठा हॉलिवूड ओपनर ठरेल. इतकेच नाही तर 'मिशन: इम्पॉसिबल – द फायनल रेकनिंग', 'द कॉन्ज्युरिंग: लास्ट राईट्स' (१६.९० कोटी रुपये) आणि 'डेमन स्लेअर: किमेत्सू नो यायबा – इन्फिनिटी कॅसल' यांना मागे टाकेल.

परदेशाबरोबरच भारतातही याची क्रेझ पाहायला मिळत आहे. 'अवतार: फायर अँड ॲश'ची एका हाय मल्टिप्लेक्समध्ये तिकीटांचे ॲडव्हान्स बुकिंग रिलीजच्या दोन आठवड्यांआधी शुरू झाली बोती. १० डिसेंबर पासून ॲडव्हास बुकिंग सुरू झाली आहे. चित्रपटाच्या रिलीजमध्ये अद्याप एक आठवडा बाकी आहे. एका रिपोर्टनुसार 'अवतार: फायर अँड ॲश' भारतात ५०० कोटींचा गल्ला जमवू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT