मनोरंजन

sarnobat : प्रतापराव गुजर यांच्या पराक्रमाची गाथा उलगडणार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने व शेकडो मावळयांच्या बलिदानाने महाराष्‍ट्रात स्वराज्य उभारले गेले. महाराजांशी निष्ठा व स्वराज्य रक्षणाची तळमळ प्रत्येक मावळ्याच्या नसा-नसात भिनली होती. शेकडो वीरांच्या शौर्याची साक्ष मातीचा कण आणि कण देत आहे. स्वराज्य रक्षणासाठी प्राणांची आहुती दिलेल्या वीरांच्या आठवणींशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होत नाही. अशाच शूरवीरांच्या गाथेला उजाळा देण्यास दिग्दर्शक दिपक कदम 'सरनोबत' अर्थात वेडात मराठे वीर दौडले सात (sarnobat) हा चित्रपट आणत आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर आणि मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. मराठीसह हा चित्रपट हिंदी आणि तेलगू भाषेतही प्रदर्शित होणार आहे. (sarnobat )

जैन फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत, गौतम मुथा यांनी चित्रपटाची निर्मिती केलीय. दिग्दर्शक दीपक कदम यांनी सरनोबत चित्रपटातून वेडात मराठे वीर दौडले सात असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते त्या शूर सेनानींचा म्हणजेच प्रतापराव गुजर, विसाजी बल्लाळ, दिपोजी राउतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्दी हिलाल व विठोजी शिंदे यांचा पराक्रम हुबेहूब मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

याआधी दीपक कदम यांनी 'पुरषा', 'ऍट्रोसिटी', 'एका लग्नाची गोष्ट', 'नगरसेवक एक नायक', 'वाक्या', 'गोल माल प्रेमाचा', 'संसाराची माया' यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी अनेक मालिकांचेही दिग्दर्शन केले आहे. 'पुरषा' हा वेगळ्या धाटणीचा ॲवॉर्ड विनिग चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.

लवकरच हिंदी भाषिक ऐतिहासिक 'सरनोबत' हा चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीस घेऊन येण्यास सज्ज झाले आहेत. या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक दीपक कदम बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यास सज्ज झाले आहेत. चित्रपटाला देव – सुचिर यांनी संगीत दिले आहे. , एस. के. वल्ली यांनी चित्रपटाची भव्यदिव्यता चित्रित केली आहे. चित्रपटाची संकल्पना संजय कसबेकर, दीपक कदम यांची आहे. चित्रपटाची कथा अभिजित कुलकर्णी लिखित आहे.

दिग्दर्शक दीपक कदम असे म्हणाले की, 'सरनोबत' म्हणजेच प्रतापराव गुजर, आपण लहानपणापासून एक गाणं ऐकतोय. म्यानातून उसळे तलवारीची पात। वेडात मराठे वीर दौडले सात, पण हे सात मराठा वीर कोण आणि ते का दौडले आणि त्यांचे पुढे काय झाले याचा मागोवा घेणारी ही फिल्म आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT