पाकिस्तानी बालकलाकार उमर शाहचे निधन झाले आहे. उमरचे वय फक्त 15 वर्षांचे होते. कार्डियाक अरेस्टने उमरचे निधन झाल्याचे समोर येत आहे. त्याचा भाऊ अहमदने इंस्टाग्रामवर पोस्ट शेयर करत या घटनेची माहिती दिली आहे. यावेळी त्याने उमरच्या चिरशांतीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहनदेखील चाहत्यांना केले आहे. सोमवारी ह्रदयाची गती बंद पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. (Latest Entertainment News)
उमर 'जितो पाकिस्तान' आणि 'शान ए रमजान' या पाकिस्तानी शोमध्ये उमर दिसला होता. इतक्या कमी वयात कार्डियाक अरेस्टने उमरचा मृत्यू झाल्याने चाहते शोकाकुल आहेत.
जितो पाकिस्तानचे होस्ट फाहाद मुस्तफा यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून उमरला श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेत्री माहिरा खान आणि मोमल शेख यांनीही उमरला श्रद्धांजली वाहिली आहे.
उमरचा भाऊ अहमद त्याच्या पीछे देखो पिछे या युट्यूब व्हीडियोने चर्चेत आला होता. त्याचा क्युट लुक, डोळ्यांवरील चश्मा आणि बोलण्याची पद्धत यामुळे तो लगेच व्हायरल झाला होता.
त्याचा भाऊ अहमद आपल्या शोक संदेशात म्हणतो की, ‘ आमच्या घरातील लहानसा स्टार, उमर शाह अल्लाहकडे परत गेला आहे. मी सगळ्यांना प्रार्थना करतो की त्याच्यासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करा.’ विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वीच उमर आणि अहमदची बहीण आयेशाचे निधन झाले होते.