मनोरंजन

HBD Twinkle Khanna : ट्विंकलची बहीण सुद्धा आहे अभिनेत्री, तिच्याविषयी माहितीये का?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ट्विंकल खन्नाचा जन्म २९ डिसेंबर, १९७४ रोजी पुण्यात झाला. ती आपला ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. ट्विंकलचं नाव टीना खन्ना आहे. प्रेमाने तिला ट्विंकल म्हणतात. २९ डिसेंबर, १९७४ रोजी जन्मलेल्या ट्विंकल आणि तिचे वडील राजेश खन्ना यांचा वाढदिवस एकाच दिवशी येतो. ट्विंकल ही दिवंगत अभिनेते राजेश खन्ना आणि अभिनेत्री डिंपल कपाडिया (HBD Twinkle Khanna) यांची मुलगी आहे. ट्विंकलची बहीण रिंकी खन्नादेखील अभिनेत्री आहे. तिच्याविषयी तुम्हाला माहिती आहे का? (HBD Twinkle Khanna)

ट्विंकल जेव्हा १० वर्षांची होती, तेव्हा तिचे आई-वडील वेगळे झाले होते. यानंतर ट्विंकल आणि तिची बहिण रिंकी ही आपल्या आईसोबत म्हणजे डिंपल कपाडियासोबत राहू लागली. ट्विंकल आपल्या वडिलांसोबत राहत होती, तेव्हा मोठमोठ्या गाड्यांमधून फिरायची. परंतु, वडिलांपासून वेगळे झाल्यानंतर ती आपल्या आईसोबत आजीच्या घरी राहू लागली, तेव्हा त्यांच्याकडे इतके पैसे नव्हते. ती लोकल रेल्वेने प्रवास करायची. जेव्हा ट्विंकलने पहिला चित्रपट साईन केला तेव्हा सर्वात आधी ॲडव्हान्स मिळालेल्या पैशांनी एक गाडी खरेदी केली होती.

ट्विंकल शिक्षणात हुशार होती. तिला सीए व्हायचं होतं. तिला लेखिकादेखील व्हायचं होतं. परंतु, ट्विंकलच्या आईला वाटायचं की आपल्या मुलीने अभिनेत्री व्हावं. तिच्या आईला वाटायचं की, एकदा जर ती सुपरस्टार बनली तर तिचं आयुष्य बदलेल.

ट्विंकल खन्नाला अभिनेते धर्मेंद्र यांनी लॉन्च केलं. धर्मेंद्र यांनी त्यांचा लहान मुलगा बॉबी देओलसोबत ट्विंकलला चित्रपट बरसातमध्ये लॉन्च केलं. राजकुमार संतोषी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटासाठी ट्विंकलला फिल्मफेअरचा बेस्ट डेब्यू ॲवॉर्डदेखील मिळाला. यानंतर तिने दिल तेरा दीवाना, जब प्यार किसी से होता है आणि बादशाह यासारखे अनेक चित्रपट केले.

अशी झाली लव्हस्टोरीला सुरुवात

अक्षय कुमार आणि ट्विंकल यांची भेट एका फोटोशूटवेळी झाली होती. तेव्हा त्यांच्यात आधी मैत्री झाली आणि नंतर प्रेम. दोघांनी लग्न एका विचित्र अटीवर केलं होतं. अक्षय कुमार – ट्विंकल एक दिवस बसले होते. अक्षय म्हणाला की, जर तुझा चित्रपट मेला फ्लॉप झाला तर तू आणि मी लग्न करायचं. ट्विंकलला इतक्या लवकर लग्न करायचं नव्हतं. मेला चित्रपटाला यश मिळणारचं असा तिचा विश्वास होता. पण, हा चित्रपट फ्लॉप ठरला आणि अक्षय कुमार-ट्विंकल खन्नाचे लग्न झाले.

ती इंटीरियर डिझायनर झाली. ट्विंकलने अनेक स्टार्सच्या घरांचे इंटीरियर डिझाईन केलं. ती निर्मातीदेखील आहे. ती लेखिकादेखील आहे. ट्विंकलने मिसेज फनीबोन्ससह तीन पुस्तके लिहिली.

बहीण रिंकी खन्नाही अभिनेत्री

रिंकी ही ट्विंकल खन्नाची छोटी बहीण आहे. रिंकी नेहमी लाईमलाईटपासून दूर राहते. रिंकीने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं, पण तिला बॉलीवूडमध्ये म्हणावे तसे यश मिळाले नाही.

रिंकीने चित्रपट 'प्यार में कभी-कभी' मधून डेब्यू केलं होतं. हा चित्रपट १९९९ मध्ये आला होता. 'जिस देश में गंगा रहता हैं' नंतर तिचा शेवटचा चित्रपट २००४ मध्ये 'चमेली' होता. यानंतर तिने कोणत्याही चित्रपटात काम केलं नाही.

लंडनमध्ये राहते रिंकी

रिंकीने २००३ मध्ये समीर सरनशी लग्न केले होते. तो एक बिझनेसमन आहे. रिपोर्टनुसार, रिंकी आपला पती आणि मुलगी नाओमिकासोबत लंडन, युनायटेड किंगडममध्ये शिफ्ट झाली होती. लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांना एक मुलगादेखील झाला. रिंकी खन्ना मीडिया आणि सोशल मीडिया दोन्हींपासून दूर आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT