नगर :  नवीन वर्षात मिळणार मुबलक पाणी : आमदार संग्राम जगताप

नगर :  नवीन वर्षात मिळणार मुबलक पाणी : आमदार संग्राम जगताप

नगर :  पुढारी वृत्तसेवा :  शहराची वाढती लोकसंख्या आणि त्या तुलनेत उपलब्ध होणारे कमी आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवतो. शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अमृत पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यातून लवकरच शहराला मुबलक 118 लाख लिटर पाण्याचा साठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शहराचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. वसंत टेकडी येथील जुन्या 68 लाख लिटर पाण्याच्या टाकीच्या कामाची पाहणी आमदार संग्राम जगताप यांनी केली.

यावेळी आयुक्त डॉ. पंकज जावडे, नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, माजी नगरसेवक निखील वारे, नगरसेवक सुनील त्रिंबके, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, संतोष ढाकणे, पाणीपुरवठा अधिकारी रोहिदास सातपुते आदी उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले, नगर शहराला वसंत टेकडी येथील जुनी 68 लाख लिटर पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा होत होता. जुन्या टाकीला गळती सुरू झाल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते.  दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, लवकरच त्याद्वारे पाणीपुरवठा सुरू होणार आहे. त्यामुळे नगर शहराला 68 लाख लिटर पाण्याची टाकी व 50 लाख लिटर पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा केला जाणार आहे. फेज टू योजनेमधील विविध भागातील टाक्या कार्यान्वित होणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news