तुझ्या रूपाचं चांदनं : गरीबाघरी सौंदर्य हे शाप आहे का?  
मनोरंजन

तुझ्या रूपाचं चांदनं : गरीबाघरी सौंदर्य हे शाप आहे का?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

सौंदर्य आणि तिरस्कार यामध्ये प्रेमाची कसोटी लागणार आहे. प्रत्येक मुलीला वाटतं असतं आपण सुंदर दिसावं. सुंदर असणं वा तसं जन्माला येणं हे काही कोणाच्या हातात नसतं ते भाग्यात असतं; पण सौंदर्यचं जर अभिशाप असेल तर? जर सुंदर दिसणंचं पाप असेल तर? याच आणि अश्याच अनेक प्रश्नांमधून जातं आहे आपली नक्षत्रा. तुझ्या रूपाचं चांदनं ही मालिका लवकरचं भेटीला येत आहे. प्रेक्षकांना तुझ्या रूपाचं चांदनं या मालिकेची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे.

नक्षत्राची आई तिला लहानपणापासून सांगत आली आहे गरीबाघरी सौंदर्य हे शाप असतं आणि म्हणूनचं तिची आई नक्षत्राचं सुंदर रूप समाजापासून लपवून ठेवतं आहे;  पण काय होईल जेव्हा सुंदर रूपाचा तिरस्कार करणारा दत्ता नक्षत्राला भेटेल? त्‍याच्‍या  तिरस्कारला नक्षत्रा प्रेमात बदलू शकेल? नक्षत्रा तिचं खरं रूप काही कारणांमुळे लपवत आहे. तो या सत्यापासून अनभिज्ञ आहे. तिरस्कार आणि सत्याच्या दुधारी तलवारीवर कसा रंगणार नक्षत्रा आणि दत्तच्या प्रेम कहाणीचा करार? प्रेमाची परिभाषा बदलायला येत आहे "नक्षत्रा"कलर्स मराठीवर.२७ डिसेंबरपासून सोम ते शनि रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर

अनिकेत जोशी म्हणाले, "गेल्या वर्षभरात आम्ही वेगवेगळे प्रयोग केले. ज्यामध्ये सुंदरा मनामध्ये भरली, जीव माझा गुंतला सारख्या वास्तवादी मालिका असो वा जय जय स्वामी समर्थ सारखी आध्यात्मिक मालिका याला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यानंतर बिग बॉस मराठी सारखा शो ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र बघत होता, या कार्यक्रमालाही उत्तम प्रतिसाद मिळाला.

मालिकांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर मला असं वाटतं, प्रत्येक वाहिनीचा वा कार्यक्रमाचा एक प्रवास असतो. त्या प्रत्येक टप्प्यावर प्रेक्षकांना काहीतरी वेगळं अपेक्षित असतं. तेच देण्याच्या उद्देशातून आम्ही येणार्‍या दोन्ही मालिकांमध्‍ये करणार आहोत.

एकंदरीतचं स्पर्धा बघता प्रेक्षकांकडे विविध माध्यम आहेत त्यांच्या मनोरंजनासाठी आणि म्हणूनच वेगवेगळ्या विषयांवरील मालिका, कथा घेऊन येणं ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे आणि त्यासाठीचं आम्ही आमचा फिक्शन शोचा प्राईम टाईम एक्सटेंड केला आहे.

मालिकेनिमित्त बोलताना विराजराजे म्हणाले, बिग बॉसचे तिसरे पर्व जेव्हा सुरू झाले तेव्हा कुठेना कुठे आता बिग बॉस नंतर काय याचा विचार सुरू झाला होता. कलर्स मराठीवर येऊ घातलेल्या दोन्ही मालिकांचे विषय (आई -मायेचं कवच, तुझ्या रूपाचं चांदनं) अतिशय वेगळे पण तितकेचे मनाला भिडणारे आहेत. अत्यंत महत्त्‍वाचा सामाजिक संदेश या दोन्ही मालिकांमधून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

विराज राजे म्हणाले- मालिकेतील नक्षत्रा अश्या मुलीचं प्रतिनिधित्व करते ज्यांचं बालपण एका अश्या समजुतीमध्ये गेलं आहे की, गरीब घरात सुंदर म्हणून जन्माला येणे हा शाप आहे. बाह्यसौंदर्याला अधिक महत्व देणार्‍या आपल्या समाजात नक्षत्रा सारख्या अनेक मुलींना त्यांच्या रूपावरून, शरीरयष्ठी वरुन रंगावरून हिणवलं जातं. त्यांना दूषण दिली जातात. आम्ही घेऊन येत असलेल्या या दोन्ही मालिकांमुळे आपल्या समजाचा हा दृष्टीकोन बदलण्यास नक्कीच सुरुवात होईल अशी आशा आम्ही करतो. दोन्ही मालिकांमध्ये नायिकेचा तिचा संघर्ष बघायला मिळणार आहे. आम्हांला खात्री आहे या दोन्ही मालिका प्रेक्षकांच्या पंसतीस उतरतील.

कैलाश अधिकार (तुझ्या रूपाचं चांदनं मालिकेचे निर्माते), म्हणाले, प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. असं म्हणतात प्रत्येकच माणूस हा सुंदर असतो प्रश्न हा असतो की बघणारी व्यक्ती तुमच्याकडे कोणत्या दृष्टीने बघते.

मालिकेमध्ये नक्षत्राच्या नजरेतून अतिशय सुंदरपणे मानवी भावना, सामाजिक समस्या, समाजाचा दृष्टीकोण बघायला मिळणार आहे. तर, दुसरीकडे नाईकेचा संघर्ष आणि तिला मिळणारी नायकाची साथ. प्रेक्षक एक वेगळी प्रेमकथा बघण्यासाठी उत्सुक आहेआणि तीच आम्ही या मालिकेद्वारे मांडण्याचा प्रयत्न करत आहोत.आमची ही नवीन मालिका रसिक प्रेक्षकांच्या मनात नक्की भरेल अशी अपेक्षा आहे.

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT