Tumbbad 2  instagram
मनोरंजन

Tumbbad 2 च्या विलेनसाठी अक्षय खन्नाच्या नावाची चर्चा, धुरंधरनंतर दहशत पसरवणार 'डकैत'

Tumbbad 2 च्या विलेनसाठी अक्षय खन्नाच्या नावाची चर्चा, धुरंधरनंतर दहशत पसरवणार 'डकैत'

स्वालिया न. शिकलगार

‘तुम्बाड 2’मध्ये खलनायकाच्या भूमिकेसाठी अक्षय खन्ना यांचे नाव चर्चेत आले आहे. ‘धुरंधर’नंतर त्यांच्या दमदार अभिनयामुळे मेकर्स त्यांना गडद आणि भयावह भूमिकेसाठी विचारात घेत असल्याची चर्चा आहे. अधिकृत घोषणा नसली तरी चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Tumbbad 2 akshaye khanna villain role

Tumbbad 2 हा सोहम शाहचा २०१८ मध्ये रिलीज झालेला चित्रपट आहे. या चित्रपटाने सर्वांचेच लक्ष वेधले होते. आता सोहम या चित्रपटाचा सीक्वल बनवत आहेत. ज्यामध्ये विलेन म्हणून अक्षय खन्नाला ॲप्रोच करण्यात आल्याचे वृत्त आहे.

जेव्हापासून अभिनेता-निर्माता सोहम शाहने डॉ. जयंतीलाल गडा यांच्या पेन स्टूडियोज सोबत काम करण्याचे ठरवले आङे, तेव्हापासून 'तुंबाड-२' (Tumbbad 2) विषयी एक्सायटमेंट खूप वाढली आहे. आरआरआर आणि गंगूबाई काठियावाडी यासारखे मोठे चित्रपट बनवण्यासाठी प्रसिद्ध प्रोडक्शन हाऊसच्या सीक्वलला पाठिंबा देण्यासोबतच ट्रेड सर्कल हा चित्रपट सर्वात मोठा प्रोजेक्ट असल्याचे म्हणत आहे.

‘तुंबाड २’मध्ये विलेनच्या भूमिकेसाठी बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. काही रिपोर्टनुसार अक्षय खन्ना आणि नवाजुद्दीन सिद्दीकी या दोघांच्या नावांवर विचार होत आहे आणि त्यापैकी एक खलनायक भूमिका साकारू शकतो.

तुंबाड-२ हा पहिल्या भागाच्या वातावरणाशी सुसंगत असेल. आधी ‘तुंबाड’ (२०१८) हा हॉरर – फॅन्टसी चित्रपट होता ज्याची कहाणी लालसेपासून पुढे जाणाऱ्या भयाण जगावर केंद्रित होती. ‘धुरंधर’ मध्ये निभावलेल्या रहमान डकैतच्या भूमिकेनंतर अक्षय खन्नाचा खलनायक म्हणून अभिनयाचा दबदबा अधिक आहे.

‘तुंबाड २’च्या कथानकात यापूर्वी न पाहिलेली, अधिक खोल कथा आणि भयानक शत्रू असणाऱ्या पात्राची आवश्यकता असल्याचे चित्रपटाचे टीमचे मत आहे. अद्याप अधिकृत घोषणा येईपर्यंत कोणाला विलेनची भूमिका मिळणार, हे निश्चित समजलेले नाही. पण मोठ्या पडद्यावर अक्षय खन्नाला पुन्हा विलेन अवतारात पाहणे त्याच्या फॅन्ससाठी पर्वणीच असेल.

तुंबाडला (२०१८) खूप प्रेम आणि कौतुक मिळाले होते. २०२४ मध्ये तो री-रिलीज करण्यात आला होता. यामध्ये मुख्य भूमिकेत सोहम शाह होता. हॉरर चित्रपटाचे दिग्दर्शन राही अनिल बर्वेने केलं होतं. बॉक्स ऑफिसवर पहिल्या रिलीजमध्ये १५ कोटींच्या जवळपास आणि री-रिलीजमध्ये ३८ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT