मनोरंजन

तुला शिकवीन चांगलाच धडा : कमलसोबत लग्नासाठी अक्षरा तयार?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : झी मराठी वरील "तुला शिकवीन चांगलाच धडा" ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. भुवनेश्वरी, अधिपती आणि अक्षरा ही पात्रेदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसताहेत. ह्या मालिकेत प्रेक्षकांनी आतापर्यंत पहिले की, अक्षरा बरोबर कमलचे लग्न ठरलं आहे. ह्या लग्नाची पत्रिका अक्षराचे बाबा अधिपतीला देतात. अक्षराचे लग्न ठरले आहे हे पाहून अधिपतीला फारच धक्का बसणार आहे, अधिपतीचे अक्षरावर प्रेम आहे ज्याची अक्षराला अजिबात कल्पना नाही. मनातून खचलेला अधिपती स्वतःलाच दोष देत एकांतात एका नदीकाठी बसतो, अधिपतीने दिलेल्या या इमोशनल सीन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे, खूप लोकांनी त्याच्या या कामाचं कौतुक केलंय.

मी मास्तरीण बाईंसाठी आईसाहेबांकडे भांडलो, ही सगळी शिकलेली माणसे अशीच धोका देतात असे म्हणत, मित्रांजवळ अधिपती आपली व्यथा मांडतो. दुसरीकडे अक्षराकडे लग्नाची धामधूम सुरू आहे. अक्षरासहित सर्व कुटुंबीय आनंदात आहेत. अक्षरांचे हात मेहेंदीने रंगणार आहेत. तेव्हा अक्षरा आणि अधिपतीच्या नात्याला इथेच पूर्णविराम लागणार की वेगळ काही घडणार? हे जाणून घेणे उत्सुकतेचे ठरेल.

तुला शिकवीन चांगलाच धडा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT