tujhya majya sansarala ani kay hav 
मनोरंजन

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं : देशमुखांच्या घरी दोन वेगळ्या चुली होणार?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं आता एका विलक्षण वळणावर आली आहे. सिद्धार्थ अमेरिकेच्या हट्टापायी कुटुंबियांच्या मनाचा, त्यांच्या भावनांचा बिलकुल विचार करत नाही आहे. सिद्धूच्या हिस्सा मागण्याने आता देशमुखांच्या चुली वेगळ्या होणार अशी भीती बयो आजीला वाटते. पण अदिती त्यांना विश्वास देते की, ती असं कधीही होऊ देणार नाही.

तात्यांच्या निर्णयानुसार सगळे मिळून सिदला थोडी थोडी पैशांची मदत करायची ठरवतात, पण मिलिंदच्या सांगण्यावरुन सिद्धार्थ ती मदत नाकारतो आणि मला प्रॉपर्टीमधला हिस्साच हवा यावर अडून बसतो. शेवटी तात्या वकीलाला बोलावून फॅक्टरीच्या पदावरुन सिद्धार्था बेदखल करतात आणि फॅक्टरीची मालकीण फक्त अदितीला बनवतात.

tujhya majya sansarala ani kay hav

सिद्धार्थ आता आदळआपट करुन नाही, तर प्रेमाने सगळ्यांना गंडवून हेतू साध्य करायचं ठरवतो. त्यासाठी, घरात पडेल ती नोकरासारखी सगळी कामं करायला सुरुवात करतो. अदितीला सिद्धार्थच्या प्रामाणिक प्रयत्नांविषयी विश्वास वाटू लागतो. सिद्धार्थला त्याची चूक कळेल का? त्याच्या अशा वागण्यामुळे देशमुखांच्या घरी दोन चुली होणार का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

हेही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT