मुंबई - अभिनेत्री केतकी नारायण आगामी मराठी चित्रट तू माझा किनारामुळे चर्चेत आहे. केतकी नारायण समजूतदार आणि भावनिक आईच्या रूपात तर भूषण प्रधान एका संवेदनशील, अंतर्मुख वडिलांच्या भूमिकेत आहेत. नुकताच रिलीज झालेला या चित्रपटाचा ट्रेलर सिनेप्रेमींच्या पसंतीस उतरला आहे. केतकी नारायण मुख्य भूमिकेत आहे.
केतकी तेलुगू, मल्याळम, हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये दिसली होती. तिने युथ, उदाहरनार्थ नेमाडे असे मराठी चित्रपट, अंडरवर्ल्ड, विचित्रम असे मल्याळम चित्रपट, फादर, चिट्टी, उमा कार्तिक असे तेलुगू चित्रपट आणि ८३ या हिंदी चित्रपटात दिसली आहे. ती अनेक म्युझिक व्हिडिओ, शॉर्ट फिल्म्स, वेब सीरिजमधूनही ती दिसलीय. तर भूषण प्रधान घरत गणपती, लग्न कल्लोळ, जुनं फर्निचर, ऊन सावली यांसारख्या चित्रपटांत दिसला होता.
केतकी नारायणने भूषण सोबत फोटोशूट केलं होते, जे सोशल मीडियावर खूप व्हायरल झालं होतं. अनेकांना वाटलं की, भूषणने लग्ने केलं आहे. पण, ते चित्रपटाच्या प्रमोशनसाठी असल्याचे नंतर लक्षात आले.
‘तू माझा किनारा’ हा चित्रपट म्हणजे नात्यांच्या भावविश्वातून उलगडणारा एक हळवा आणि जिव्हाळ्याचा प्रवास आहे. शब्दांपलीकडील भावना आणि कुटुंबातील आपुलकी यांना चित्रपटात सुंदरपणे साकारण्यात आले आहे.
केतकी-भूषण शिवाय केया इंगळे, प्रणव रावराणे,अरुण नलावडे यांच्या भूमिका असतील.
‘तू माझा किनारा’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये वास्तव जीवनातील नात्यांची कोमल छटा दिसून येते. दैनंदिन जगण्यातल्या साध्या क्षणांमधून उमटणारे प्रेम, नात्यांतील न बोललेले भाव आणि वेदना यांची सुंदर गुंफण या कथेत दिसते. हा चित्रपट फक्त बापलेकिच्या नात्याचा प्रवास नसून प्रत्येक प्रेक्षकाला स्वतःच्या कुटुंबातील भावना आणि नाती पुन्हा जाणवून देणारा आहे.
चित्रपटाची निर्मिती जॉइसी पॉल जॉय, सह-निर्माते सिबी जोसेफ, जॅकब जेव्हियर आहेत. कथा, पटकथा आणि दिग्दर्शन क्रिस्टस स्टीफन, पटकथा - संवाद चेतन किंजळकर यांचे आहेत. छायांकन एल्धो आयझॅक, संकलन सुबोध नारकर, कला दिग्दर्शन अनिल केदार यांचे आहे.
‘तू माझा किनारा’ ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.