Tom Holland-Zenday secret marriage  instagram
मनोरंजन

Tom Holland-Zenday secret marriage | टॉम हॉलेंड-अभिनेत्री झेंडायाने आधीच लग्न केलंय का? 'स्पायडर मॅन' कपलच्या लग्नाच्या चर्चांना उधाण

Tom Holland-Zenday secret marriage | टॉम हॉलेंड-अभिनेत्री झेंडायाने आधीच लग्न केलंय का? 'स्पायडर मॅन' कपलच्या लग्नाच्या चर्चांना उधाण

स्वालिया न. शिकलगार

हॉलिवूडमधील ‘स्पायडर-मॅन’ जोडी टॉम हॉलेंड आणि झेंडाया यांची लग्नाच्या चर्चांना पुन्हा एकदा गती मिळाली आहे. त्यांच्या स्टायलिस्ट लॉ रॉचने एका रेड कार्पेटवर एका बातचीतमध्ये सांगितले की, “विवाह आधीच झाला आहे, तुम्ही चुकलात!” तो म्हणाला की ही गोष्ट “खरोखरच खरी” आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये विवाहाची चर्चा जोरात सुरू झाली आहे.

om Holland-Zenday tie not?

हॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल अभिनेता टॉम हॉलेंड आणि अभिनेत्री झेंडाया यांनी लग्न केल्याची चर्चा सुरु आहे. लग्न झाले असतानाही हॉलिवूडला याबद्द कसे कळले नाही, असा प्रश्नदेखील काही जण विचारताहेत.

'स्पायडर मॅन' फेम स्टार कपल अभिनेता टॉम हॉलेंड आणि अभिनेत्री झेंडाया यांनी गुपपूच साखरपुडा उरकला होता. झेंडायाच्या हातात डायमंड रिंग पाहिल्यानंतर त्यांचा साखरपुडा झाल्याचे वृत्त समोर आले. टॉम आणि झेंडाया बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते.

अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे ८२ वा गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात झेंडायाच्या हातात डायमंड रिंग दिसली होती. आता दोघांनी लग्न केल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, या गोष्टीचे खंडन देखील या कपलने केलेले नाही वा स्वीकारलेले देखील नाही. मीडिया रिपोर्टनुसार, तिच्या डाव्या हातात एक प्लेन गोल्ड बँड दिसला. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु झाली.

२०२६ ॲक्टर ॲवार्ड्समध्ये, झेंडायाचा जवळचा मित्र आणि स्टायलिस्ट लॉ रोच रेड कार्पेटवर बातचीत करत होता. तेव्हा झेंडायाच्या लग्नाची चर्चा झाली. यावर रोच म्हमाला की, लग्न आधीच झाले आहे. हे खरं आहे का, असे रोचला विचारल्यानंतर तो हसला आणि म्हणाला की, हो हे खरं आहे. रिपोर्ट्सनुसार, झेंडाया-टॉम हॉलेंड दोघांच्या रिप्रेजेंटेटिव्सने हे वृत्त न अफवा असल्याचं सांगितलं अन् न नकार दिला.

डायमंड रिंगने वेधलं होतं लक्ष

गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री झेंडाया रेड कार्पेटवर ऑरेंज गाऊनमध्ये स्पॉट जाली. यावेळी तिने गळ्यात डायमंड नेकलेस आणि डायमंड रिंग घातली होती. झेंडायाच्या हातातील डायमंड अंगठी सोहळ्यात चर्चेचा विषय ठरली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, झेंडायाची अंगठी डायमंड जेसिका मॅककॉर्मॅकने डिझाईन केली होती. तिचे वजन ५.०२ कॅरेट आणि किंमत अंदाजे ४ कोटी रुपयांपेक्षा जास्त होती.

अशी सुरु झाली होती झेंडाया - टॉम हॉलेंडची लव्ह स्टोरी

दोघे जण पहिल्यांदा २०२६ मध्ये 'स्पायडर-मॅन: होमकमिंग'च्या शूटिंगवेळी भेटले होते. त्यांनी त्यावेळी सांगितले होते की, दोघे जण केवळ मित्र आहेत. २०१७ पर्यंत स्पायडर-मॅन चित्रपटांवर काम करत करत दोघांमध्ये जवळीकता वाढली. पण दोघांनी ही गोष्ट खूप खासगी ठेवली होती.

आगामी प्रोजेक्ट

ते पुन्हा एकदा 'स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे'मध्ये स्क्रीनवर एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट ३१ जुलै, २०२६ रोजी चित्रपटगृहात येईल. ते क्रिस्टोफर नोलन दिग्दर्शित 'द ओडिसी'मध्ये देखील एकत्र दिसणार असून तो १७ जुलै, २०२६ रोजी रिलीज होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT