टॉम हँक्स-रॉबिन राईट ३० वर्षांनंतर पुन्हा एकत्र दिसणार आहे   Tom Hanks-Robin Wright Twitter
मनोरंजन

फॉरेस्ट गंप' नंतर ३० वर्षांनी टॉम हँक्स-रॉबिन राईट पुन्हा एकत्र

टॉम हँक्स-रॉबिन राईटची जोडी पुनः एकत्र; 'हियर'चा ट्रेलर रिलीज

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : जवळपास ३० वर्षे झाली; ‘फॉरेस्ट गंप’ मध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केल्यानंतर अभिनेता टॉम हँक्स-रॉबिन राईट पुन्हा एकदा एकत्र येत आहे. त्यांचा चित्रपट ‘हियर’चा पहिला लूक जारी करण्यात आला होता. ऑन-स्क्रीन जोडीला फॅन्स पुन्हा पाहण्यासाठी उत्साहित होते. पहिल्या लूक शिवाय चित्रपटाचा ट्रेलर देखील जारी करण्यात आला आहे. ‘हियर’चा १ मिनिट ४९ सेकंदाचा लांब ट्रेलर आहे.

ट्रेलर जसजसा पुढे जातो, कहाणीचा अंदाज प्रेक्षकांना येतो. ट्रेलर पाहून वाटते की, कहाणीचा प्लॉट इंटरेस्टिंग आहे. अनावश्यक VFX आणि मेकअपचा उपयोग करण्याऐवजी अभिनेत्यांचा डी-एज लूक नव्या तंत्रज्ञानाचा वापर निर्मात्यांनी केला आहे. शिवाय टॉम हँक्स-रॉबिन राईट यांच्यातील केमिस्ट्री जुन्या आठवणी ताजे करते. त्यांना पाहून प्रेक्षकांना 'फॉरेस्ट गंप' नक्की आठवण येईल.

'हियर'च्या ट्रेलरवर प्रतिक्रिया देत एका चाहत्याने म्हटले की, "तंत्रज्ञान हळूहळू तुम्हाला घाबरवते.'' टॉम हँक्स-रॉबिन राईट, पॉल बेटनी, केली रेली, मिशेल डॉकरी स्टारर ‘हियर’ चे दिग्दर्शन रॉबर्ट जेमेकिसने केले आहे. हा चित्रपट रिचर्ड मॅकगायरच्या ग्राफिक कादंबरीवर आधारित आहे. हा चित्रपट १५ नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT