प्रभास-दीपिकाचा 'Kalki 2898 AD' पडद्यावर; 'फायटर' चं मोडणार रेकॉर्ड?

प्रभास-दीपिकाचा 'कल्की 2898 एडी' आज पडद्यावर
Kalki 2898 AD
Kalki 2898 ADKalki 2898 AD

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ स्टार प्रभास आणि बॉलिवूड, हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोणचा आज धमाकेदार 'कल्की 2898 एडी' ( Kalki 2898 AD ) चाहत्यांच्या भेटीस आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता त्याची प्रतिक्षा संपली असून धमाकेदार 'कल्की 2898 एडी' चित्रपट पडद्यावर आला आहे. तर दुसरीकडे चित्रपटाच्या ओपनिंगच्या आधीच कमाईचे आकडे वाढत आहेत. अभिनेता ऋतिक रोशनच्या 'फायटर' चित्रपटाच्या रेकॉर्ड तोडणार असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान चित्रपट देश- विदेशात पाहण्यासाठी चाहत्याची गर्दी दिसून येत आहे.

Kalki 2898 AD
बर्थडेला दिशाचा ‘कल्की 2898 AD’ मधील लूक; रिलीज आधीच ‘RRR’चा मोडला रेकॉर्ड

बॉक्स ऑफिसवर कमाईचे आकडे वाढले

अखेर ज्या दिवसांची वाट चाहते आतुरतेने पाहत होते तो दिवस आला. साऊथ अभिनेता प्रभास आणि बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोणचा आज धमाकेदार 'कल्की 2898 एडी' चित्रपट पडद्यावर आज रिलीज झाला. यानंतर चित्रपटाच्या प्रत्येक पात्राची जोरदार चर्चा रंगली. तर दुसरीकडे नेटकऱ्यांकडून चित्रपटाबद्दल वेगवेगळे रिव्ह्यू समोर येत आहेत. या चित्रपटात प्रभास आणि दीपिका पादुकोणसोबत बिग बी अमिताभ बच्चन, कमल हासन हे देखील दिसले आहेत. याच दरम्यान 'कल्कि'च्या कमाईच्या आकडे वाढत चालले आहे.

Kalki 2898 AD
‘कल्की 2898 AD’मधील प्रभासची झलक समोर, ट्रेलरची उत्सुकता

ॲडव्हान्स बुकिंगमधून 'कल्की' ची भरघोष कमाई

मिळालेल्या माहितीनुसार, 'कल्की 2898 एडी' च्या हिंदी आवृत्तीने ॲडव्हान्स बुकिंगमधून भरघोष अशी कमाई केली आहे. जगभरात एकूण १.२५ लाखांहून अधिक तिकिटे ॲडव्हान्स बुकिंगमधून विकली गेली आहेत. यानंतर आज ओपनिंगच्या दिवशी कमाईचे आकडे वाढणार आहेत. दरम्यान बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनच्या 'फायटर' चा ओपनिंगचा रेकॉर्ड मोडणार असेही चित्र दिसत आहे. मात्र, अद्याप पहिल्या दिवसाची आकडेवारी समोर आलेली नाही. हा चित्रपट या वर्षातील हिंदीतील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक आहे. म्हणूनच तिकिटे आणि सिनेमा गृहात गर्दी पाहायला मिळत आहे.

Kalki 2898 AD
‘कल्कि 2898 एडी’ ट्रेलरमध्ये दीपिकाची भूमिका लक्षवेधी (Video)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news