टायगर श्रॉफ यांच्या गाडीवर गोळीबार झाल्यानंतर आता मुंबई पोलिसांकडून टायगर श्रॉफला पोलिस सुरक्षा देण्यात आली आहे. या अगोदरही हे आरोपी जागेची रेखी करत होते. जवळपास वीस दिवस अगोदर हल्लेखोर मुंबईमध्ये आले होते, अशी माहिती समोर आलीय. सध्या सुरक्षेच्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी टायगरला सुरक्षा दिली आहे.
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात तिन्ही आरोपींना आज पोलिस मुंबईत आणणार. राजस्थानच्या कोटा रेल्वे कॉलनी पोलिस स्टेशनमध्ये तिन्ही आरोपींना ठेवल्याची माहिती समोर आलीय. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांना मुंबईत आणले जाणार आहे. रेल्वे किंवा विमानाने न आणता गाडीने आरोपींना मुंबई आणत असल्याचे म्हटले जात आहे.
सूत्रांनुसार, टायगर श्रॉफवर हल्ला करणाऱ्या आरोपींना सोमवारी, १९ ऑक्टोबर रोजी कोटाच्या कोर्टात हजर करण्यात आलं आहे. त्याठिकाणी मुंबई पोलिसांनी आरोपींची ट्रांजिट रिमांडची मागणी केली होती. यास कोर्टाने मंजूरी दिली. आरोपी ४८ तास ट्रांजिट रिमांडवर असतील. हा रिमांड बुधवारी सायंकाळी ७ वाजता संपणार आहे.