मनोरंजन

Weekend Web Series : घरी बसून पाहा ‘या’ ५ वेबसीरीज

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

Weekend Web Series – बाहेर उन्हाचा तडाखा आहे. मग, घरी राहून वीकेंडला काय पाहावे? वीकेंडला बाहेर जाण्याचा प्लॅन करत नसाल तर घरी बसून या पाच वेब सिरीज बघून मनोरंजन करा. जर तुम्ही या वीकेंडला कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन बनवला असेल आणि काही कारणास्तव तुमचा प्लान बिघडला असेल तर काळजी करण्यासारखे काही नाही. तुम्ही घरी बसून तुमच्या वीकेंडचा पुरेपूर आनंद घेऊ शकता. तुम्हाला फार काही करण्याची गरज नाही, फक्त या पाच वेब सिरीज पहाव्या लागतील. कॉमेडीपासून ते सस्पेन्सपर्यंत प्रत्येक विषयाच्या या वेबसीरीज पाहण्यास हरकत नाही. (Weekend Web Series)

your honour

युअर ऑनर (Your Honor)

ई. निवास दिग्दर्शित युअर ऑनर या वेबसिरीजमध्ये अभिनेता जिमी शेरगिल, गुलशन ग्रोव्हर, माही गिल, रिचा पालोडे आणि झीशान कादरी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या मालिकेचे दोन सीझन आले आहेत. यामध्ये पोलीस, प्रशासन, न्यायालयीन यंत्रणा यांची अंतर्गत लढाई अतिशय मनोरंजक पद्धतीने दाखवण्यात आली आहे. तुम्ही ते सोनी लिव्हवर पाहू शकता. ही एक क्राईम थ्रिलर मालिका आहे.

द क्राउन (The Crown)

या मालिकेत ऑलिव्हिया कोलमन राणी एलिझाबेथ २ च्या भूमिकेत दिसत आहे. या शोमध्ये राणीच्या साम्राज्यातील चढ-उतार दाखवण्यात आले आहेत. द क्राउनने एमी ॲवॉर्ड्स २०२१ मध्ये सर्वोत्कृष्ट नाटक मालिका, सर्वोत्कृष्ट अभिनेता (नाटक) आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता असे प्रमुख पुरस्कार जिंकले आहेत. तुम्ही ते Netflix वर पाहू शकता.

the crown

सिक्स

तुम्ही ३० मिनिटांत ही वेब सीरिज पाहून पूर्ण कराल. मर्डर मिस्ट्रीवर ही वेब सिरीज बनवली आहे. यामध्ये मंदिरा बेदीला श्रीमंत उद्योगपती कशिश सुरा यांच्या हत्येचे गूढ उकलायचे आहे. तुम्ही डिस्ने + हॉटस्टारवर हे पाहू शकता.

six

डिकपल्ड

मनू जोसेफ निर्मित आणि लिखित आणि हार्दिक मेहता दिग्दर्शित 'डिकपुल्ड' हा चित्रपट एका शहरी भारतीय जोडप्याच्या जीवनावर आधारित आहे. सुरवीन चावला आणि आर माधवन यांनी यात काम केले आहे. ही मालिका Netflix वर स्ट्रीम करण्यासाठी उपलब्ध आहे.

decoupled

रूहानियत

ही एक रोमँटिक ड्रामा मालिका आहे. यामध्ये अर्जुन बिजलानी, अमन वर्मा, कनिका मान, स्मिता बन्सल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'रुहानियत' ही मालिका MX Player वर पाहू शकता.

ruhaniyat
SCROLL FOR NEXT