मनोरंजन

काँग्रेस नेते राज बब्बर पुन्हा ‘सप’च्या वाटेवर?

अनुराधा कोरवी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: उत्तर प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो. अभिनेते आणि काँग्रेस नेते राज बब्बर नाराज असून, ते पुन्हा समाजवादी पक्षात प्रवेश करू शकतात, असे संकेत आहेत. बब्बर हे सपचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे.

बब्बर यांनी नुकतेच केलेल ट्विट पक्षाच्या धोरणांपासून वेगळे असल्याचे दिसते आहे. गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर जयराम रमेश यांनी टीका केली असली तरी बब्बर यांनी आझाद यांना शुभेच्छा दिल्या होत्या. जी-23 समूहातील आझाद यांची प्रशंसा केल्याने टीका झाल्यावर बब्बर यांनी ट्विट केले की, विरोधी पक्षातील नेत्याच्या कामाचा सन्मान करण्याने पुरस्काराचे महत्त्व वाढते. स्वतःच्या सरकारमध्ये कुणीही इच्छापूर्ती करू शकते. पद्मभूषण पुरस्कारावर वादाची गरज नाही.

बब्बर यांनी 1980 च्या दशकात जनता दलातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. नंतर ते सपमध्ये गेले. 1999 आणि 2004 मध्ये त्यांनी आग्र्यातून लोकसभा निवडणूक जिंकली होती. 2006 मध्ये त्यांची सपतून हकालपट्टी केली गेली. त्यानंतर ते 2008 मध्ये काँग्रेसमध्ये गेले. 2009 मध्ये त्यांनी फिरोजाबादमधून पोटनिवडणूक जिंकली होती. मात्र, 2014 आणि 2019 मध्ये ते पराभूत झाले.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT