सातारा : सहाजण तडीपार : संशयित लोणंद- उंब्रजमधील | पुढारी

सातारा : सहाजण तडीपार : संशयित लोणंद- उंब्रजमधील

सातारा : पुढारी वृत्तसेवा: सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी उच्छाद घातलेल्या टोळ्यांवर पोलिस प्रशासनाची करडी नजर कायम असून शुक्रवारी लोणंद व उंब्रज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सहा जणांच्या टोळीला तडीपार करण्यात आले. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी नव्या वर्षातील प्रतिबंधात्मक कारवाईची धडाकेबाज सुरुवात केल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राकेश उर्फ सोन्या भगवान भंडलकर (वय 21, रा.तांबवे ता.फलटण), सौरभ संजय जगताप (वय 21, रा. सालपे ता.फलटण) या दोघांना 2 वर्षांसाठी संपूर्ण सातारा जिल्हा, पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर, भोर व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून तडीपार करण्यात आले आहे. दोन्ही संशयितांवर खून, दुखापत करुन दरोडा, जबरी चोरी, पेट्रोल चोरी, हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

उंब्रज पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अक्षय शंकर पाटोळे (वय 23, पाटोळेवस्ती, शिरसावडे ता. खटाव), राहूल चंद्रकांत जाधव (वय 21, रा. मसूर), राहूल चंद्रकांत जाधव (वय 21), शरद संजय चव्हाण (वय 21), प्रसाद श्रीरंग जाधव (वय 30, तिघे रा. मसूर ता. कराड) यांना तडीपार करण्यात आले आहे. संशयितांना 1 वर्षासाठी संपूर्ण सातारा जिल्ह्यातून व सांगली जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर, वाळवा व शिराळा तालुक्यातून तडीपार करण्यात आले आहे.

या टोळीविरुध्द अपहरण, गर्दी मारामारी यासह विविध गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, दोन्ही टोळ्यांचे प्रस्ताव त्या-त्या पोलिस ठाण्यातून पोलिस अधीक्षक यांच्याकडे पाठवण्यात आले. दोन्ही टोळ्यांना पोलिसांनी वेळोवेळी सुधारण्याची संधी दिली. मात्र त्यांच्याकडून सर्वसामान्यांवर उपद्रव सुरु होता. संशयितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार पोलिस अधीक्षक यांच्या प्राधिकरणासमोर सुनावणी झाली व संशयितांना तडीपार करण्यात आले.

हेही वाचलंत का? 

Back to top button