मनोरंजन

झोंबिवली: सिद्धार्थ जाधवच्या ‘अंगात आलया’ (video)

अनुराधा कोरवी

मुंबई; पुढारी ऑनलाईन : दोन वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर चित्रपटगृह सुरू झाल्याने मनोरंजनाची मोठी पर्वणी चाहत्यांसाठी खुली झाली आहेत. दर्जेदार आणि वैचारिक प्रगल्भता जपणारा आगामी मराठी 'झोंबिवली' चित्रपट येत्या ४ फेब्रुवारी २०२२ रोजी चाहत्यांच्या भेटीला येत आहे. आदित्य सरपोतदार याच्या उत्कृष्ट दिग्दर्शनाने सज्ज असा चित्रपट सध्या चर्चेत आहे.

मराठीतल्या 'झोंबिवली' चित्रपटात नेमकी किती आणि कोणती गाणी असणार यावर चाहत्यांच्यात चर्चा होता. या चर्चांना आता पुर्णविराम मिळाला असून या चित्रपटातील एक गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या गाण्याचे बोल 'अंगात आलया' असे आहेत. 'अंगात आलया' हे गाणे प्रशांत मदपूवर यांनी लिहिले असून रोहन रोहन यांनी संगीतबद्ध केले आहे.

तर 'अंगात आलया' हे गाणं रोहन प्रधान याने गायिले आहे. 'अंगात आलया' हे गाणं चित्रपटानुसार झोंबीनी भरलेलं आहे. सगळ्यांना आपल्या तालावर नाचायला लावेल अशा या गाण्यावर अमेय, वैदेही आणि ललितसोबत एक खास पाहुणा नाचताना दिसतो. तो म्हणजे सर्वांचा लाडका 'सिद्धार्थ जाधव'.

अफाट अॅनर्जी असलेला सिद्धार्थला या गाण्यावर थिरकताना पाहिल्यावर अनेकांच्या भुवया उंचावतात. या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार सांगतात की, 'सिद्धार्थ माझ्या गेल्या तिन्ही चित्रपटात दिसला आहे, तो नेहमीच माझ्यासोबत कलाकृतीत एका लकी चार्म असल्यासारखा असतो. या चित्रपटातील हे गाणं त्याच्यासाठी खास लिहिल्यासारखं वाटत, कारण त्याची ती सकारात्मकता आणि अफाट ऊर्जा. त्याच्या असण्यातच सकारात्मक ऊर्जा सामावलेली आहे.

हे गाणं चित्रपटात महत्वाचं आहे आणि त्यासाठी सिध्दार्थला मी विचारल्यावर त्याचा लगेच होकार येणं हे तितकेच महत्वाचं होत असं मला वाटतं. त्याने साकारलेला झोंबी डान्सर हा खरच स्पेशल आहे'. असे त्यानी म्हटले आहे.

या गाण्याच्या सुरुवातीला विनोदवीर विनायक माळी दिसले आहेत. या गाण्यातील विशेष म्हणजे, या गाण्यात झोंबी दिसले असून त्यांना अगदीच लग्नाच्या वरातीत नाचताना आपण पाहणार आहोत. या गाण्याच नृत्य दिग्दर्शन रंजू वर्गिस यांनी केले आहे.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT