यावेळी मनोज मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल असून जयदीप अहलावतच्या निशाण्यावर आहे. सीरीज २१ नोव्हेंबर रोजी प्राईम व्हिडिओवर रिलीज होईल.
The Family Man S3 Trailer released
मुंबई - अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवरील लोकप्रिय स्पाय-थ्रिलर वेब सिरीज द फॅमिली मॅन पुन्हा एकदा परतली आहे. मनोज वाजपेयी अभिनित या सिरीजचा सीझन ३ चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. 'द फॅमिली मॅन ३' मध्ये यावेळी श्रीकांत तिवारी धक्का दणार आहे. मनोज बाजपेयी म्हणजेच श्रीकांत तिवारी आता मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल बनला आहे. संशयाची सुई त्याच्यावरच आहे. अखेर असे काय झालं? यावेळी नव्या भूमिकांची देखील एंट्री झाली आणि त्यांनी जबरदस्त तडका लावला. याची झलक ट्रेलरमध्ये दिसते.
'द फॅमिली मॅन ३' मध्ये जुन्या कलाकारांसोबत काही नव्या कलाकारांची भूमिका देखील असतील. तिसऱ्या सीजनमध्ये जयदीप अहलावत देखील आहेत. यावेळी श्रीकांतला आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. सोबत निमरत कौर देखील आहे.
'द फॅमिली मॅन ३' च्या ट्रेलरमध्ये आहे तरी काय?
'द फॅमिली मॅन ३'च्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे की, श्रीकांत अखेर आपल्या फॅमिलीला सांगतो की, तो काय काम करतो. जेव्हा तो सांगतो की, तो एक स्पाय एजेंट आहे, तेव्हा मुलांना मोठा झटका लागतो. पुढील सीनमध्ये समजतं की, श्रीकांत म्हणजेच मनोज वाजपेयीच्या विरोधात अरेस्ट वॉरंट निघाले आहे. श्रीकांत मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल बनला आहे, त्याच्या शोधामागे पोलिस लागतात.
'हे' आहेत द फॅमिली मॅन सीझन ३ चे कलाकार
या नव्या सीजनमध्ये मनोज वाजपेयी शिवाय, जयदीप अहलावत, निमरत कौर देखील सहभागी आहेत. शारिब हाशमी, प्रियामणि, अश्लेषा ठाकुर, वेदांत सिन्हा, श्रेया धन्वंतरी आणि गुल पनाग यासारखे बहुचर्चित कलाकार देखील वापसी करत आहेत.
२१ नोव्हेंबर रोजी सीरीजचा प्रीमियर होणार आहे. द फॅमिली मॅन ३ जगभरात २४० हू अधिक देशात उपलब्ध होणार आहे.