The Family Man  pudhari photo
मनोरंजन

The Family Man 4th Season: मृत्यूच्या दारात उभ्या असणाऱ्या श्रीकांतचं काय होणार.. जाणून घ्या फॅमिली मॅनचा चौथा सीजन कधी येणार

Anirudha Sankpal

  • तिसऱ्या हंगामाचा क्लिफहँगर एन्ड

  • पुढचा हंगाम कधी येणार?

  • हा तर शेवट नाही मध्यांतर

The Family Man 4th Season: मनोज वाजपेयी यांची मुख्य भूमिका असलेल्या द फॅमिली मॅन वेब सिरीजची भारतात प्रचंड क्रेज आहे. या वेब सिरीजमध्ये एका अंडर कव्हर स्पाय इजंटची भन्नाट कथा सांगितली आहे. ही वेब सिरीज रहस्य, उत्सुकता, कॉमेडी अन् सरप्राईजचा भरणा असलेली असल्यानं याची जनमानसांवर चांगली पकड आहे. या वेब सिरीजचे आतापर्यंत ३ सीजन आले आहे.

तिसऱ्या हंगामाचा क्लिफहँगर एन्ड

नुकताच आलेल्या तिसऱ्या सीजनमध्ये आता श्रीकांत तिवारीची मोठी होत असलेली मुलं अन् घटस्फोटापर्यंत पोहचलेले वैवाहिक जीवन त्यातच देशासमोर असलेला अशांत नॉर्थ ईस्ट अन् चीनचा प्रश्न या सर्व फ्रंटवर लढणारा श्रीकांत आपल्याला शेवटच्या एपिसोडपर्यंत खिळवून ठेवतो. मात्र म्यानमारमधील एका बाका प्रसंगातून कसाबसा सुटून बाहेर पडत असलेल्या श्रीकांत जखमी झालेला दाखवण्यात आला आहे. तो जखमी अवस्थेततच भारताच्या बॉर्डरजवळ बेशुद्ध पडतो अन् तिथंच तिसरा सीजन संपतो.

हा तर शेवट नाही मध्यांतर

निर्मात्यांनी तिसरा सीजन अशा ठिकाणी आणून संपवला आहे की लोकांची चौथ्या सीजनबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. लोक आता चौथ्या सीजन कधी येणार याची वाट पाहत आहेत.

नुकतेच द फॅमिली मॅनचे निर्माते राज निदिमोरू आणि दिग्दर्शक डीके यांनी तिसऱ्या सीजनचा एन्ड अन् चौथा सीजन कधी रिलीज होणार याबाबत अपडेट दिली आहे. एका मुलाखतीत निर्मात्यांनी आमच्याकडे एक मोठा प्लॅन आहे अन् तिसऱ्या हंगामाचा शेवट हा शेवट नसून तो या मोठ्या प्लॅनचा मध्यांतर आहे असं सांगितलं.

पुढचा हंगाम कधी येणार?

दिग्दर्शक डीके यांनी द फॅमिली मॅनचा पुढचा हंगाम कधी येणार याबाबत मोठी अपडेट दिली आहे. ते म्हणाले की चौथा सीजन लगेच येणार आहे का? मला वाटत आपल्याला वाट पहावी लागेल. मात्र असं असलं तरी चौथा सीजन हा तिसऱ्या सीजनपेक्षा लवकर रिलीज केला जाईल. द फॅमिली मॅनच्या दुसऱ्या अन् तिसऱ्या सीजनमध्ये चार वर्षाचे अंतर होते.

द फॅमिली मॅनचा दुसरा सीजन हा जून २०२१ मध्ये आला होता. त्यानंतर आता २०२५ मध्ये चौथा सीजन आला. एवढा उशीर का झाला याचे कारण देखील डीके यांनी सांगितले. ते म्हणाले की आम्हाला या सीजनच्या रिसर्चसाठी थोडा जास्त वेळ लागला. या सीजनची कथा जरी काल्पनिक असली तरी हा सीजन पाहताना असं वाटलं पाहिजे की या घटना कधीतरी घडून गेल्या आहेत.'

जयदीप अहलावतची दर्जेदार एन्ट्री

फॅमिली मॅनच्या चौथ्या हंगामात जयदीप अहलावत यांची एन्ट्री झाली होती. त्यांनी रूकमा या ड्रग्ज डीलरची भूमिका निभावली आहे. आता चौथ्या सीजनमध्ये हा रूकमा काय धुमाकूळ घालतो याची उत्सुकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT