The Family Man Season 4: ‘द फॅमिली मॅन’चा 4 सिझन कधी येणार? श्रीकांत तिवारीच्या पुढच्या मिशनची उत्सुकता शिगेला!

The Family Man Season 4: ‘द फॅमिली मॅन’चा तिसरा सिझन नुकताच रिलीज झाला असून प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहेत. कथेमधील क्लिफहॅंगर्स पाहता चौथा सिझन नक्की येणार असल्याचा अंदाज आहे आणि त्याची प्लॅनिंग सुरू आहे.
 ‘द फॅमिली मॅन’चा 4 सिझन कधी येणार?
‘द फॅमिली मॅन’चा 4 सिझन कधी येणार?Pudhari
Published on
Updated on

The Family Man 4 Release Date,: मनोज बाजपेयी यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात राज्य केलेली स्पाय-थ्रिलर वेब सिरीज ‘द फॅमिली मॅन’ चा तिसरा सीझन नुकताच ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनीही या सिझनला चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता सगळ्यांना एकच उत्सुकता आहे ती म्हणजे सीझन 4 कधी येणार याची.

तिसऱ्या सीझनचा शेवट अनेक रहस्यांवर झाला आहे. त्यामुळे कथा पुढे नेण्यासाठी चौथा सीझन नक्कीच येणार, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. निर्माता-दिग्दर्शक राज & डीके सध्या सीझन 4 ची प्लॅनिंग करत असल्याची माहिती समोर आली आहे.

 ‘द फॅमिली मॅन’चा 4 सिझन कधी येणार?
Labour Law: खासगी कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढणार! आता 9 ऐवजी 10 तास काम करावं लागणार? राज्य सरकारचा लवकरच मोठा निर्णय

अजून पर्यंत या सिरीजबद्दल अधिकृत घोषणा झालेली नाही. पण रिपोर्ट्सनुसार, चौथ्या सिझनचे लेखन सुरू आहे आणि शूटिंग कदाचित 2026 च्या मध्यापासून सुरू होऊ शकते.

या सिरीजमध्ये प्रत्येक सीझनच्या मध्ये मोठा गॅप असतो —
सीझन 1 – 2019
सीझन 2 – 2021
सीझन 3 – 2025

त्यामुळे असा अंदाज आहे की The Family Man 4 कदाचित 2028 च्या आसपास रिलीज होऊ शकतो. मात्र रिलीज डेट निर्मात्यांच्या प्लॅनिंग, कलाकारांच्या शेड्यूल आणि OTT प्लॅटफॉर्मच्या निर्णयावर अवलंबून राहणार आहे. चाहत्यांसाठी चांगली बातमी म्हणजे श्रीकांत तिवारीची गोष्ट अजून संपलेली नाही.

 ‘द फॅमिली मॅन’चा 4 सिझन कधी येणार?
Evolution of Kissing: किस करण्याची सुरुवात कधी झाली? शास्त्रज्ञांनी सांगितला उत्क्रांतीचा इतिहास

कारण सिझन 3 च्या शेवटी श्रीकांतच्या वैयक्तिक आयुष्यातील टर्निंग पॉइंट्स, त्याच्या कुटुंबातील तणाव, आणि प्रोफेशनल मिशनमधील एक मोठं संकट याचं कोडं अजून सुटणं बाकी आहे. आता सिझन 4ची अधिकृत घोषणा कधी होते याचीच उत्सुकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news