अनेक अडचणी आणि समस्यांनंतर आता थलपती विजय यांच्या 'जन नायकन' चित्रपटाबद्दल अखेर एक मोठी बातमी समोर आलीय. निर्मात्यांनी अद्याप अधिकृत घोषणा केलेली नसली तरी, चित्रपटाचे कॅनेडियन वितरक यॉर्क सिनेमाजने एक्स अकाऊंटच्या माध्यमातून रिलीजची तारीख जाहीर केलीय.
थलपती विजय यांच्या बहुप्रतीक्षित 'जन नायकन' चित्रपटाबाबत अखेर मोठे अपडेट समोर आले आहे. अनेक महिन्यांपासून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी मानली जात आहे. ताज्या वृत्तांनुसार, चित्रपटाच्या परदेशातील वितरकाने जुलै महिन्यात चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यॉर्क सिनेमाजकडून मिळालेल्या माहितीनुसार, ''अखेरीस! आपला लाडका थलपथी विजय #JanaNayagan सह मोठ्या पडद्यावर आग लावण्यासाठी सज्ज आहे. 🇨🇦 यॉर्क सिनेमाजतर्फे कॅनडामध्ये प्रदर्शित २४ जुलैपासून पडद्यावर धुमाकूळ.''
तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या सिनेकरिअरमधील जन नायकन हा शेवटचा चित्रपट आहे. कॅनडाच्या वितरकाने 'जन नायकन'च्या रिलीजची तारीख निश्चित केलीय.
एच. विनोथ दिग्दर्शित 'जन नायकन' रिलीज होण्याच्या आधीच विजय यांनी राजकारणाची वाट धरली. रिलीजच्या तारखा निश्चित होत असताना हा चित्रपट लांबला. त्यातच तामिळनाडूतील निवडणुकीमुळे जन नायकन सेन्सॉरमध्ये अडकला. पण, विजय हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर जन नायकनच्या तारखेसाठी कॅनेडियन वितरकाने तरी घोषणा केलीय. आता निर्मात्यांच्या घोषणेकडे प्रेक्षकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
'जन नायकन' हा विजय यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. दिग्दर्शक एच. विनोत यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटात पूजा हेगडे, प्रियमणी, बॉबी देओल, प्रकाश राज आणि इतर कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.