मुंबई- नुकताच अभिनेत्री निर्माती तेजस्विनी लोणारी हिचा साखरपुडा पार पडला. तिने सोशल मीडियावर तिच्या या खास सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. तिने केलेला मराठमोळा लूक खास ठरला आहे. पिवळ्या रंगाची पैठणी, मराठमोळा लूक आणि सोबतीला मराठमोळा साज असा शृंगार करून तिने सर्वांचे लक्ष वेधले आहे! (latest Marathi entertainment news)
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी लोणारी सध्या तिच्या साखरपुड्याच्या खास लूकमुळे चर्चेत आली आहे. नुकत्याच झालेल्या साखरपुड्याच्या सोहळ्यात तेजस्विनीने आईच्या आवडीचे दागिने परिधान करून ती लक्षवेधी ठरली. मराठमोळ्या साजात ती अप्रतिम दिसत होती.
तेजस्विनीने पारंपरिक मराठी नऊवारी साडी नेसली होती. सोबतच सोन्याची नथ आणि कुंदनच्या दागिन्यांनी तिच्या लूकला अधिक खुलवले. या दागिन्यांमध्ये तिच्या आईचे विशेष योगदान आहे. तिच्या आईच्या आवडीचे हे दागिने आहेत
सोशल मीडियावर तेजस्विनीचे हे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. फॅन्सनी तिच्या पारंपरिक लूकचं कौतुक केलं आहे.
तेजस्विनी लोणारीने नेहमीच आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. मात्र या साखरपुड्याच्या समारंभात तिच्या नैसर्गिक सौंदर्याला आणि पारंपरिक लूकला सगळ्यांनी दाद दिली. तिच्या साडीचा रंग, हलकासा मेकअप, आणि सोन्याच्या दागिन्यांची जुळवाजुळव यामुळे संपूर्ण लूकला एक राजेशाही टच मिळाला.
तेजस्विनी येवल्याची आहे. त्यामुळे तिने या खास दिनी पैठणी साडी नेसली. त्याला साजेसा लूक तिने केला होता. पारंपरिक अंदाजात तेजस्विनी अगदीच सुंदर दिसत होती.
काय म्हणाली तेजस्विनी?
तेजस्विनी म्हणाली, "माझ्या आयुष्यातल्या खास क्षणी मला आपलासा वाटणारा लूक हवा होता आणि म्हणून माझी पिवळी पैठणी आणि आईने हौशीने केलेलं दागिने हे सगळं हे खूप खास होत. आईने केलेली नथ आणि बाजूबंद गळ्यात असलेला एक सुंदर हार हे सगळं आईने माझ्यासाठी अगदी हौशीने केलेल्या दागिन्यां पैकी आहेत. प्रत्येक आईला आपल्या मुलीला तिच्या आयुष्याची नवीन सुरुवात करताना एक भेट द्यायची असते आणि ती या खास शृंगाररुपात आहे अस मला वाटतं आणि म्हणून साखरपुड्याला मी हा मराठमोळा साज असलेला लूक केला होता"