Taskaree trailer released  instagram
मनोरंजन

सोन्याच्या स्मगलिंग नेटवर्कवर आधारित वेब सीरीज, इमरान हाशमी-अमृताच्या ‘Taskaree’चा ट्रेलर पाहाच

Emraan Hashmi-Amruta Khanvilkar | सोन्याच्या स्मगलिंग नेटवर्कवर आधारित वेब सीरीज, इमरान हाशमी-अमृताच्या ‘तस्करी’चा ट्रेलर पाहाच

स्वालिया न. शिकलगार

सोन्याच्या तस्करीच्या अंडरवर्ल्डवर आधारित ‘Taskaree’ वेब सीरीजचा ट्रेलर प्रेक्षकांसमोर आला असून, इमरान हाशमी आणि अमृता खानविलकर यांच्या दमदार भूमिका विशेष लक्ष वेधून घेत आहेत. क्राईम, थ्रिल आणि राजकीय सत्तासंघर्ष यांची गुंफण या सीरीजमध्ये पाहायला मिळणार आहे.

Taskaree trailer out now

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच दमदार बहुप्रतीक्षित वेब सीरिज "तस्करी"चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. "तस्करी" १४ जानेवारीपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. एक थरारक अ‍ॅक्शन पॅक सीरिज आहे. या सीरिज मध्ये बॉलिवूड स्टार इम्रान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसणार असून दिग्दर्शक नीरज पांडे यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर देखील या सीरीजचा एक भाग आहे.

इमरान हाशमीची नवी वेब सीरीज ‘तस्करी: द स्मगलर्स वेब’चा ट्रेलर गुरुवारी रिलीज करण्यात आला. ही सीरीज आंतरराष्ट्रीय सोने तस्करी नेटवर्कवर आधारित आहे. नीरज पांडे दिग्दर्शित ही क्राईम-थ्रिलर सीरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल. निर्मात्यांचा दावा आहे की, या प्रोजेक्टवर जवळपास अडीच वर्षांपर्यंत रिसर्च आणि स्क्रिप्ट डेव्हलपमेंटचे काम केले गेले आहे.

अडीच मिनिटांच्या ट्रेलरमध्ये इमरान हाशमी एक प्रामाणिक सतर्क कस्टम अधिकारी अर्जुन मीनाच्या भूमिकेत आहे. विमानतळावरून कहाणीची सुरुवात होते. प्रत्येक वर्षी शेकडो टन सोने अवैधरित्या देशात आणले जाते. ट्रेलरमध्ये ५०० किलो सोन्याची एका मोठ्या विटेवरून गुप्त माहिती, शोधात काम करणाऱ्या एजन्सी आणि तस्करांचे अंतरराष्ट्रीय नेटवर्क दाखवण्यात आले आहे.

सीरीजमध्ये अमृता खानविलकरचीही शरद केळकरचीही महत्त्वाची भूमिका आहे.

काय म्हणाली अमृता खानविलकर?

अमृता म्हणाली, "तस्करी" चा प्रवास माझ्यासाठी खूप खास ठरला आहे. मागील वर्षी जानेवारीमध्येच मी तस्करीच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आणि २०२६ या नव्या वर्षाची सुरुवात तिच्या रिलीज ने होणार आहे याहून नवीन वर्षाची काय सुंदर सुरुवात होऊ शकते! विशेष म्हणजे या भूमिकेसाठी मला ऑडिशनही द्यावं लागलं नाही. कास्टिंग डायरेक्टर विकी सदानाह यांच्या माध्यमातून माझी नीरज सरांशी भेट झाली मी एक सीन सादर केला आणि त्यांना तो खूप आवडला आणि तिथेच तस्करीची गोष्ट पक्की झाली."

या सीरिजमध्ये अमृताचे भरपूर अ‍ॅक्शन सीन्स आहेत. ती ‘मिताली’ ही व्यक्तिरेखा साकारत असून खूपच स्ट्रॉंग आणि कस्टम्स टीममधील मी एक महत्त्वाची सदस्य आहे. १४ जानेवारीपासून नेटफ्लिक्सवर ही सीरीज प्रदर्शित होतेय. अमृता २३ जानेवारीपासून डिस्नी हॉटस्टारवरील ‘स्पेस जेन - चंद्रयान’ या आगामी प्रोजेक्टमध्येही झळकणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT