tara sutaria new house  instagram
मनोरंजन

Tara Sutaria New Home | एक नवी सुरुवात..तारा सुतारियाच्या स्वप्नातलं घर, शेअर केली इंटिरिअर झलक

Tara Sutaria New Home | एक नवी सुरुवात..तारा सुतारियाच्या स्वप्नातलं घर, शेअर केली इंटिरिअर झलक

स्वालिया न. शिकलगार

बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया हिने तिच्या नव्या घराची खास झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. “एक नवी सुरुवात” असे कॅप्शन देत तिने इंटिरिअरचे सुंदर फोटो पोस्ट केले. घरातील मिनिमल आणि एलिगंट डिझाइन पाहून चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

बॉलिवूडमध्ये आपल्या स्टाइल आणि अभिनयामुळे वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिने नुकतेच तिच्या नव्या घराची झलक सोशल मीडियावर शेअर करत “एक नवी सुरुवात” अशी भावनिक पोस्ट केली आहे. तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ताराने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या घराचे इंटिरिअर अतिशय एलिगंट आणि क्लासी दिसत आहे. पांढऱ्या कलरच्या भिंतीवरील डेकोरेशन, आकर्षक सजावटीमुळे घराचा शांत आणि आलिशान लूक दिसत आहे. लिव्हिंग रूममध्ये ठेवलेली कलात्मक चित्रे, सुंदर झुंबर आणि आधुनिक फर्निचर विशेष लक्ष वेधून घेत आहेत.

भिंतींवर साधे पण सुंदर आर्टवर्क, इनडोअर प्लांट्स आणि सॉफ्ट लाईटिंगमुळे घर लक्झरी लूक दिसत आहे

ताराने हे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. ताराने इन्स्टाच्या पोस्टमध्ये म्हटलंय- 'नव्या सुरुवातीसाठी.. माझ्या पहिल्या घरात अंतहीन हास्य आणि प्रेमासाठी आणि २०२६ ला उघड्या हातांनी स्वीकारण्यासाठी.'

ताराच्या करिअरबाबत बोलायचे झाल्यास, तिने Student of the Year 2 मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांत काम केले.

अलिकडेच ती तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आली होती. आता नव्या घरासोबत तिने तिच्या आयुष्यातील नव्या टप्प्याची सुरुवात केलीय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT