तान्या मित्तल विरोधात पोलिसात एफआयआर (FIR) दाखल pudhari
मनोरंजन

Tanya Mittal FIR: बिग बॉसच्या घरातून तान्या मित्तलला बाहेर पडावे लागणार? तिच्या विरोधात एफआयआर (FIR) दाखल

तान्याचे तिच्या संपत्तीबाबतचे खोटे दावे, तिच्या राहणीमानाबाबतच्या पोकळ वल्गना यामुळे सोशल मिडियावरही ती बऱ्यापैकी ट्रोल होत असते

अमृता चौगुले

बिग बॉसचा 19 वा सीझन सध्या खूपच चर्चेत आहे. सतत वादविवाद आणि काही ना काही नवा तंटा या घरात होतच असतो. उरली सुरली कसर तान्या सारखे स्पर्धक त्यांच्या विचित्र आणि हास्यास्पद स्टेटमेंटने भरून काढतात. तान्याचे तिच्या संपत्तीबाबतचे खोटे दावे, तिच्या राहणीमानाबाबतच्या पोकळ वल्गना यामुळे घरातले सदस्य तर तिची खेचत असतात. पण सोशल मिडियावरही ती बऱ्यापैकी ट्रोल होत असते. पण आता हे फक्त ट्रोलिंगपुरतेच थांबले नाही. (Latest Entertainment News)

तान्या विरोधात पोलिसात एफआयआर दाखल केलेली आहे. त्यात तिच्यावर अनेक गंभीर आरोप या एफआयआरमध्ये केले गेले आहेत.

कोण दाखल केली आहे तान्या विरोधात तक्रार?

तान्याच्या विरोधात सोशल मीडिया एनफ्लूएंसर फैजान अंसारीने एफआयआर दाखल केली आहे. यात त्याने म्हणले आहे की तान्या खोटे आणि वाढवून बोलण्याच्या सवयीमुळे ग्वाल्हेर शहराचे नाव खराब करते आहे. त्याने लेखी तक्रार दाखल केली आहे. त्याचे म्हणणे आहे की तान्या मित्तल द्वारा मीडिया आणि सोशल मीडियामध्ये दिल्या स्टेटमेंटमुळे समाजात चुकीचा संदेश जात आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे.

तान्या घरात आल्यापासून अनेक वादाला तोंड फुटले आहे. या तक्रारीमुळे तिच्या बिग बॉसच्या घराबाहेरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

काय केले होते तान्या ने दावे

  • तान्याने म्हटलं होतं की, तिचं घर कोणत्याही फाइव्ह स्टार किंवा सेव्हन स्टार हॉटेलपेक्षाही जास्त महाग आणि आलिशान आहे.

  • तिने शोमध्ये दावा केला होता की तिच्या घरी स्वयंपाक आणि इतर कामांसाठी नोकर आहेत. तसेच तिच्या संरक्षणासाठी १५० बॉडीगार्डस तैनात असतात. या स्टेटमेंटनंतर तिला खूप ट्रोल केले गेले.

  • तसेच ती कॉफी ती पिण्यासाठी आग्र्याला जाते आणि दिल्लीतील हॉटेलमध्ये जाऊन जेवण करते असेही तिने सांगितले होते.

  • यापेक्षा हास्यास्पद दावा असा होता की ती जे बिस्किट खाते, ते लंडनमधून येतात आणि ती बकलावा ही मिठाई खाण्यासाठी विमानाने दुबईला जाते आणि लगेच परत येते.

तिचे हे दावे आणि सत्य यात तफावत असल्याचे अनेकांना लक्षात आले. यानंतर तिच्या ट्रोलिंगमध्ये वाढ झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT