Tamil nadu Election Result 2026 PUDHARI
मनोरंजन

Tamil nadu Election Result 2026: चर्चा तर होणारच ना भाऊ... इकडं TVK चा 'विजय'; तिकडं त्रिशानं तिरूपती मंदिरात डोकं टेकलं

Anirudha Sankpal

Vijay TVK Victory Trisha Tirupati Visit: तमिळनाडू विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल जाहीर होत आहे. अवघ्या २ वर्षाचा पक्ष टीव्हीकेने जोरदार मुसंडी मारत एकहाती सत्ता मिळवण्याच्या दिशेने कूच केली आहे. अभिनेता विजय थलपतीच्या या पक्षानं भल्या भल्या पक्षांना पाणी पाजलं. याचदरम्यान, अजून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. दाक्षिणात्य अभिनेती त्रिशाने अचानक तिरूपती मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानं ती चर्चेचा विषय ठरली आहे.

त्रिशाचे देवदर्शन चर्चेत

एकीकडे विजयचा पक्ष राज्यात विजयाची शिट्टी वाजवत असताना दुसरीकडे त्रिशाने देवदर्शन घेण्याने चर्चेला ऊत आला आहे. त्रिशाच्या देव दर्शनाच्या टायमिंगवरून चर्चा सुरू झाली आहे. या तिरूपती मंदिर भेटीला राजकीय अँगलने पाहिलं जात आहे.

आपल्या ४३ व्या वाढदिवसापूर्वी एक दिवस आधी अभिनेत्री त्रिशाने बालाजीचे दर्शन घेतलं. रविवारी रात्री त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला. यात ती तिरूपतीला जाताना दिसत आहे. सोमवारी सकाळी मंदिरात पूजा करतानाचा तिचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओत ती कोणतीही गाजा वाजा न करत शांततेत देवदर्शन करत असल्याचं दिसलं.

नेटकऱ्यांनी वर्तवला अंदाज

यानंतर सोशल मीडियावर लोकांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला. काही युजर्सनी त्रिशाचे देव दर्शन आणि निवडणूक निकाल याचा संबंध जोडण्यास सुरूवात केली. अनेकांनी त्रिशाने भगवान व्यंकटेश्वराच्या दरबारात विजयच्या टीव्हीके पार्टीच्या विजयासाठी प्रार्थना केली होती असा अंदाज वर्तवला.

यापूर्वी त्रिशाने २३ एप्रिलला मतदानाच्या दिवशी देखील इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने आपण मतदान केल्याचं सांगितलं. या पोस्टने देखील लोकांचे लक्ष वेधून घेतलं. चाहत्यांनी त्रिशाची ही पोस्ट त्यांचे मित्र आणि को स्टार विजयला पाठिंबा दर्शवणारी असल्याचा अंदाज बांधला.

मार्च महिन्यात चेन्नईतील एका लग्नात रिसेप्शनवेळी विजय आणि त्रिशा एकत्र दिसले होते. त्यावेळी देखील त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा कार्यक्रम त्याचवेळी झाला होता ज्यावेळी विजय आणि त्यांची पत्नी संगिता सोर्नलिंगम यांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्या होत्या. या दोघांनी डिसेंबर २०२५ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT