Tamil Nadu Election Results 2026: विजय थलपतींच्या घरी जल्लोष.. बर्थडे गर्ल त्रिशा पोहचली चेन्नईच्या घरी

Tamil Nadu Election Results 2026 Live
Tamil Nadu Election Results 2026 Livepudhari
Published on
Updated on

विजयच्या घरी जल्लोष 

तमिळनाडूच्या राजकारणात पदार्पणातच मोठा उलटफेर करणाऱ्या विजय थलपती यांच्या टीव्हीके पक्ष सध्या 114 जागांवर आघाडीवर आहे. बहूमतासाठी ११८ जागांची गरज असली तरी विजय हे सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे. या विजयानंतर विजयच्या घरी जल्लोष सुरू झाला असून त्याची मैत्रिण अभिनेत्री त्रिशा विजयच्या चेन्नईतील घरी पोहचली आहे.

TVK - 114

DMK - 50

AIADMK - 47

Cong - 4

तमिळनाडूत थलपतीची शिट्टी घुमली...

तमिळनाडूत नवखा पक्ष टीव्हीकेने बहूमताच्या जवळचा आकडा गाठत राज्यात एकहाती सत्ता मिळवण्याच्या दृष्टीकोणातून आगेकूच केली आहे.

TVK - 110

DMK - 60

AIADMK - 64

स्टॅलिन पिता-पुत्र पिछाडीवर 

तमिळनाडून टीव्हीकेचे वादळ सुरू असतानाच विद्यमान मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि त्यांचे पुत्र उदयनिधी हे देखील आपापल्या मतदार संघात पिछाडीवर पडले आहेत. चेपौकम सीटवर उदयनिधी तर एमके स्टॅलिन आपल्या कोलाथूर विधानसभा सीटवर पिछाडीवर पडले आहेत.

विजयच्या TVK चा दे धक्का... DMK अन् AIADMK ची उडाली धूळधाण

तमिळनाडूत विजय थलापतीचा पक्ष टीव्हीकेने सत्ताधारी DMK आणि प्रस्थापित AIADMK याची धूळधाण उडवून दिली आहे. त्यांनी फक्त शतकी मजल मारली नसून ते एकहाती सत्तेच्या अगदी जवळ पोहचले आहेत.

TVK - 171

AIADMK - 26

DMK - 26

बहूमत - 118

थलपतीने मोठा खेळ केला 

विजय थलापतीने तमिळ नाडूत मोठा खेळ केला आहे. सत्ताधारी द्रमुक पक्षाच्या बरोबरीत जागांवर आघाडी मिळवत जोरदार मुसंडी मारली आहे. दुसरीकडे AIADMK ने देखील हळू हळू का होईना आपल्या आघाडीच्या जागांचा विस्तार वाढवण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळं तमिळनाडूत पहिल्यांदाच DMK आणि AIADMK यांच्या व्यतिरिक्त तिसरा कोणता तरी पक्ष सत्तेच्या जवळ जात असल्याचं चित्र दिसत आहे.

DMK - ६२

TVK - ६२

AIADMK - ३९

विजय थलापतीची जोरदार घोडदौड

DMK - ६४

TVK - ५३

AIADMK - ३९

कसं आहे बलाबल

DMK - 68

TVK - 43

AIADMK - 25

टीव्हीकेची जोरदार मुसंडी 

जरी अण्णा द्रमुक यांनी तमिळ नाडूमध्ये ७० जागांवर आघाडी घेतली असली तरी नवखा पत्र टीव्हीकेने ३४ जागांवर मुसंडी मारत राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून समोर येत आहे.

स्टॅलिन आघाडीवर, विजयच्या TVK चीही आघाडी

निवडणुकीच्या पहिल्या कलानुसार स्टॅलिन यांची डीएमके ५५ जागांवर तर विजयची टीव्हीके ही १५ जागांवर आघाडीवर आहे.

बहुमताचा आकडा किती

एकूण जागा: २३४

बहुमताचा आकडा: ११८

मतदान दिनांक: २३ एप्रिल २०२६

निकाल दिनांक: ४ मे २०२६

प्रमुख स्पर्धक: डीएमके आघाडी (DMK+), अण्णा द्रमुक आघाडी (AIADMK+), आणि टीव्हीके (TVK).

Tamil Nadu Assembly Election Results:

तमिळनाडू विधानसभेच्या २३४ जागांसाठी झालेल्या ऐतिहासिक निवडणुकीचा आज फैसला होत असूनआतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार अभिनेता विजय थलापतीचा नवखा पक्ष टीव्हीकेने जोरदार मुसंडी मारत एकहाती सत्ता मिळवण्याच्या दृष्टीकोणातून कूच केली आहे. ते सध्या ११४ जागांवर आघाडीवर असून बहूमताच्या ११८ च्या आकड्यापासून ते फक्त ४ जागा दूर आहेत. दुसरीकडे सत्ताधारी DMK आणि प्रस्थापित AIADMK यांची टीव्हीकेच्या वादळात धूळधाण उडाल्याचे दिसत आहे.

राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक ८५.१ टक्के मतदान झाले होते. टीव्हीकेने आपण कोणासोबत जाणार नाही एक चांगला भ्रष्टाचार मुक्त तिसरा पर्याय देणार असं म्हणत निवडणूक रिंगणात उतरला होता. त्यांची ही पहिलीच निवडणूक होती. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात सत्तेपर्यंत मजल मारली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news