Tamil Actress shalini Divorce Photoshoot
मुंबई - चित्रपट इंडस्ट्रीत कपलचे घटस्फोट होणे, हे काही नवी गोष्ट नाही. पण, त्याचा आनंदोत्सव साजरा करणे, म्हणजे नवी गोष्ट ठरलीय. घटस्फोटाचा आनंद साजरी करणारी तमिळ अभिनेत्री शालिनी सध्या तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आलीय. कारण तिने केले आहे - डिवोर्स फोटोशूट. हे फोटो इतके व्हायरल होत आहेत की, त्यावर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय.
टीव्ही मालिका 'मुल्लुम मलारुम'मधून शालिनी प्रसिद्ध झाली होती. डिवोर्स फोटोशूट सोबत तिने आपल्या पतीपासून वेगले होण्याची घोषणा केलीय. तिने एक फोटोशूट सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर तिची चर्चा होत असून हे फोटोज व्हायरल होत आहेत.
फोटो शेअर करून तिने लिहिले- '९९ समस्या, पण पती...'
''एक घटस्फोटीत महिलेचा त्या लोकांसाठी संदेश आहे, जे स्वत: काही बोलू शकत नाहीत. एक वाईट विवाह तोडणे ठिक आहे कारण तुम्ही आनंदित राहण्याच्या लायक आहात. आपल्या जीवनावर नियंत्रण ठेवा आणि आपल्या मुलांसाठी एक उत्तम भविष्य बनवण्यासाठी बदल करमे गरजेचे आहे. घटस्फोट अपयश नाही.! हे तुमच्यासाठी एक महत्वपूर्ण वळण आहे आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल आणण्यासाठी एक माध्यम आहे. लग्न तोडून एकटे राहण्यासाठी देखील मोठी हिंमत असायला लागते. यासाठी मी आपल्या सर्व धाडसी महिलांना समर्पित करते."
जेव्हा तिने ही पोस्ट ऑनलाईन पोस्ट केली तर अनेक लोकांनी तिचे समर्थन केले. काहींनी तर तिची खिल्ली उडवली. त्यातील एकाने लिहिले, "काळजी करू नकोस, आता तुन्हा सर्वात आनंददायी आयुष्य मिळेल. आता मी घटस्फोटीत आहे, मी खुश आहे, परंतु, मला एकावेळचे जेवण जेवणेदेखील कटीण वाटतं. पण मी माझ्या मुलासोबत खुश आहे." आणखी एकाने लिहिलं, "चुकीच्या नात्यापेक्षा उत्तम आहे की मी त्या नात्यातून मुक्त व्हावं."
एका रिपोर्टनुसार, शालिनी जुलै २०२० मध्ये तिने पती रियाजशी लग्न केले होते. काही कालावधीनंतर त्यांना मुलगी रिया झाली. अभिनेत्रीने काही महिन्यांपूर्वी आपल्या पतीवर मानसिक आणि शारीरिक शोषणाचा आरोप केला होता. त्यानंतर तिने घटस्फोटाचा पर्याय निवडला.
शालिनीने टीव्ही मालिका मुल्लुमा मलारुममधून आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. शेवटी ती रिॲलिटी शो सुपर मॉममध्ये दिसली होती.
photo - viralbhayani insta वरून साभार