tarak mehta ulta chashma mrs hathi ambika ranjankar
मुंबई - अभिनेत्री अंबिका रंजनकरने 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये मिसेज हाथीची भूमिका साकारली होती. आता असे वृत्त समोर येत आहे की, अंबिका रंजनकरने मालिका सोडलीय. या वृत्तावर आता प्रतिक्रिया दिलीय आणि सांगितलं आहे की, ती या मालिकेतून गायब का होती.
'तारक मेहता का उल्टा चश्मा' नव्या कलाकारंमुळे चर्चेत आहे. तर काही जुने कलाकार देखील 'तारक मेहता' मालिका सोडल्याचे वृत्त समोर आले. दरम्यान, मिसेज कोमल हाथीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अंबिका रंजनकर 'तारक मेहता' तून बाहेर पडल्याचे वृत्त आहे. कारण, मागील काही एपिसोड्समध्ये ती दिसली नव्हती.
काही दिवसांपूर्वी 'जेठालाल' दिलीप जोशी आणि 'बबीता जी' मुनमुन दत्ताचेही 'तारक मेहता का उल्टा चश्मा' सोडल्याचे वृत्त समोर आले होते. दोन्ही अभिनेत्यांनी ही अफवा असल्याचे म्हटले होते. आता 'मिसेज हाथी' अंबिका रंजनकरने देखील प्रतिक्रिया दिलीय.
अंबिका रंजनकरने एका बातचीतमध्ये म्हटलं, 'नाही, मी शो सोडला नाही. मी 'तारक मेहता का उल्टा चश्मा'चा हिस्सा आहे.'
अंबिकाने पुन्हा सांगितलं की, 'तारक मेहता'च्या काही एपिसोड्समधून अचानक कशी आणि कुठे गायब झाली होती. ती म्हणाली, मी माझ्या वैयक्तिक कारणांमुळे मालिकेतून दूर होते. मला माझ्यासाठी काही वेळ हवा होता.' अंबिका रंजनकरने आता जेव्हा स्पष्ट केलं आहे, तेव्हा फॅन्सनी श्वास सोडला. अखेर मागील १७ वर्षांपासून ती या मालिकेचा एक भाग आहे.