Tarak Mehta Ka Ooltah Chashmah Madhvi Bhide Sonalika Joshi
मुंबई - तारक मेहता मालिकेमधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांचं आवडतं आहे. जेठालाल असो वा दया बेन, चंपकलाल असो वा माधवी भिडे सर्वचं कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुढ निर्माण केलं. माधवी भिडे ही भूमिका अभिनेत्री सोनालिका जोशीने साकारली होती, जी आजदेखील प्रेक्षकांना आवडते. मनमोहक हास्य आणि सिंपल लूकने माधवी बनून ती घराघरात पोहोचली. सोनालिका एक बिझनेस वूमन आहे. जाणून घेऊया सोनालिकाला माधवी आत्माराम भिडे ही भूमिका कशी मिळाली? तिने यामागील एक कहाणीही सांगितली होती.
आत्मारामची पत्नी म्हणून सोनालिका जोशीने माधवी ही भिडे भूमिका साकारलीय. तिला तारक मेहतामध्ये कसं काम मिळालं, याबद्दल एका मुलाखतीत सांगितलं होतं. ती म्हणाली की, तारक मेहता मध्ये मराठी भूंमिका आहे म्हटल्यावर मी छान पैठणी नेसली आणि मराठमोळा लूक करून ऑडिशनच्या ठिकाणी गेले होते. दरवाजातून आत गेल्यानंतर दिग्दर्शकांनी तिला पाहिलं आणि तिथेच ही भूमिका पक्की झाली. कारण, दिग्दर्शकाला तिचा मराठी लूक इतका आवडला की, त्यांनी ठरवलं, ही अभिनेत्रीच मराठी भूमिकेसाठी योग्य आहे. आणि अशा प्रकारे सोनालिका जोशीला माधवी बिडेचा रोल मिळाला.
तारक मेहता मालिकेत माधवी भिडे लोणचं आणि पापड बनवते. पण रिअल लाईफमध्ये ती बिझनेस - फॅशन डिझायनिंगशी जोडली गेलीय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये अभिनय करण्यासाठी प्रत्येक दिवशीच्या हिशेबाने २५ हजार रुपये मिळायचे. तिची संपत्ती कोटींमध्ये आहे.
सोनालिकाचा जन्म ५ जून १९७६ रोजी मुंबईत झाला. तिने आपल्या करिअरची सुरुवात थिएटरने केली. त्यानंतर ती अनेक मालिकांमध्ये दिसली. पण, तारक मेहता…मधून तिला खूप लोकप्रियता मिळाली. वेगवेगळ्या साड्य़ांमध्ये दिसणारी सोनालिका आपल्या साध्या लूकमुळे आणि प्रभावी बोलण्याने प्रसिद्ध झाली.
सोनू की मम्मी आणि मास्टर भिडेची पत्नी माधवी खऱ्या आयुष्यात ग्लॅमरस आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो व्हायरल होतात. २०१९ मध्ये समोर आलेल्या तिच्या एका फोटोने धुमाकूळ घातला होता. त्या फोटोमध्ये सोनालिका स्मोकिंग करताना दिसली होती.