Taarak Mehta Ka Ooltah Chashmah old Anjali new show  Instagram
मनोरंजन

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah old Anjali | 'तारक मेहता'ची अंजली नव्या अवतारात; पाहून फॅन्स म्हणाले, 'व्वा क्या बात है!'

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah old Anjali | 'तारक मेहता'ची अंजली नव्या अवतारात; पाहून फॅन्स म्हणाले, 'व्वा क्या बात है!'

स्वालिया न. शिकलगार

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah old Anjali actress new role

मुंबई - लोकप्रिया मालिका तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये अंजलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा मेहता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती आता नव्या मालिकेत दिसणार असून न्या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे. हा प्रोमो पाहून फॅन्स हैराण झाले आहेत.

इत्ती सी खुशी मालिकेत दिसणार तारक मेहताची अंजली

इत्ती सी खुशी या मालिकेत दिसणार आहे. मालिकेत दिवेकर परिवाराचा आनंद, संघर्ष आणि नात्यांची गुंफण सुंदर चित्रण केले जाणार आहे. आता या कहानीमध्ये नवे वळण आले आहे. अन्विता (सुम्बुल तौकीर खान)ची ऑनस्क्रीन आई हेतलची भूमिका नेहा साकारणार आहे.

हेतलची एन्ट्री नवा ड्रामा आणि भरपूर मनोरंजन मालिकेत घेऊन येईल. ती बडबडी, बिनधास्त, सर्वांची काळजी घेणारी आहे. आपला स्टायलिश, ग्लॅमरस अंदाज दाखवण्याची संधी ती कधीच सोडत नाही. पण या सर्वांमागे अशी एक स्त्री लपली आहे, जिचे चित्रपण मालिकेत पाहायला मिळणार आहे. ती खूप प्रेमळ आहे.

नेहा मेहताविषयी थोडेसे
दिल्ली के स्टार हंट-मल्टी टॅलेंट शोमध्ये ऑडिशनमधून संपूर्ण गुजरातमधून तिली निवडण्य़ात आले होते. त्यानंतर ती मुंबईत आली. तिला थिएटर्सचे ऑफर्स मिळायला लागले. त्यानंतर तिचा अभिनयाचा प्रवास सुरु केला आहे. यानंतर ती ‘तू ही मेरा मौसम’, ‘हृदय-त्रिपुटी’, ‘प्रतिबिंब का परछाई’, ‘मस्ती-मजे की लाईफ’ यासारख्या नाटकांमध्ये काम केलं. अनेक हिंदी, गुजराती मालिकेत काम केलं. नेहाने ‘प्रेम एक पूजा’, ‘जनमो-जनम’, ‘बेटर हाफ’ यासारख्या गुजराती चित्रपटांमध्ये काम केलं.

इत्ती सी खुशीमध्ये आपली भूमिका हेतल विषयी तिने सांगितले की, ''या शोचा हिस्सा होणं खूप रोमांचक आहे, कारण, यामध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की, भावना आणि कौटुंबिक क्षणांचा उत्तम मेळ यामध्ये पाहायला मिळतो. हेतलची भूमिका साकारणे, माझ्यासाठी खूप मजेशीर असेल! ती चंचल, नाटकीय, भावनांनी भरलेली आहे. पण आपल्यातील कमतरता ती खूप छान पद्धतीन लपवते. पण, आपला आत्मविश्वास आणि स्टाईलने सर्वांना हसत खेळत ठेवते. ही भूमिका आतापर्यंत केलेल्या अनेक भूमिकांपेक्षा अगदी वेगळी आहे.''

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT